कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. पोलिसांच्या छाप्यात अनेक ठिकाणी पैसे जप्त केले जातात, मात्रआता चक्क देशाच्या संसद भवनातच नोटांचा बंडल सापडला आहे. एका खासदाराच्या आसनाखाली नोटांचा बंडल आढळून आल्यानेसंसदेत चांगलाच गदारोळ माजला आहे. त्यातच, काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु संघवी यांच्याच सीटखाली हा नोटांचा बंडल सापडल्याने संसदेतील सत्ताधारी पक्षाने जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्यसभा सभापतींनी स्वत: याची माहिती सभागृहाला दिली. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचंही सभापती धनकड यांनी सांगितलं.राज्यसभा कामकाज सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात अचानकपणे राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी सर्व सदस्यांच्या निदर्शनास एक घटना आणून दिली. त्यांनी सांगितले की, काल रात्री संसदेतील सुरक्षा कर्मचारी तपासणी करत असताना२२२क्रमांकाच्या सीटखाली काही नोटांचं बंडल आढळलं. या नोटा काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या सीटखाली सापडल्या असून या नोटा खऱ्या आहेत की खोट्या याची चौकशी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड़ यांनी शुक्रवारी सभागृहाला सांगितले की, घातपात विरोधी नियमित तपासणीदरम्यान सभागृहाच्या आतून रोख रकमेचे बंडल जप्त करण्यात आले. तेलंगणातील काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आलेल्या सीट क्रमांक २२२ खाली ही रोकड सापडली आहे.
सभागृह तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी सभागृहाची नियमित तपासणी केली. यावेळी सीट क्रमांक २२२ खालून रोख रकमेचे बंडल जप्त करण्यात आले. ही बाब माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली आणि मी चौकशी ची खात्री केली. सध्या तपास सुरू आहे.
यावर प्रतिक्रिया देताना सिंघवी म्हणाले की, राज्यसभेत जाताना मी फक्त ५०० रुपयांची नोट सोबत ठेवतो. या प्रकरणाबद्दल मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. काल मी बरोबर १२ वाजून ५७ मिनिटांनी सभागृहात पोहोचलो. सभागृहाचे कामकाज दुपारी एक वाजता तहकूब करण्यात आले. त्यानंतर मी दुपारी दीड वाजेपर्यंत कॅन्टीनमध्ये बसून संसदेच्या आवारातून बाहेर पडलो.
राज्यसभेतील संसदीय पक्षाचे नेते आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही अत्यंत गंभीर घटना असल्याचे म्हटले आहे. हा सभागृहाच्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी त्यांनी सिंघवी यांचे नावही घेतले.
काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी जेपी नड्डा यांच्याकडून काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांचे नाव घेण्यावर आक्षेप घेतला. जोपर्यंत या घटनेचा तपास पूर्ण होत नाही आणि त्याची सत्यता सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणत्याही सदस्याचे नाव घेऊ नये, असे खर्गे यांनी म्हटले आहे.
सभापतींच्या या खुलाशानंतर सभागृहात जोरदार गदारोळ झाला. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. काही सदस्यांनी निःपक्षपाती चौकशीची मागणी केली तर काहींनी हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले.
संबंधित बातम्या