Bullet Train: बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; ‘रॉकेट’ वेगाने धावणार मात्र आवाज येणार नाही, जाणून घ्या कारण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bullet Train: बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; ‘रॉकेट’ वेगाने धावणार मात्र आवाज येणार नाही, जाणून घ्या कारण

Bullet Train: बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; ‘रॉकेट’ वेगाने धावणार मात्र आवाज येणार नाही, जाणून घ्या कारण

Dec 23, 2024 11:49 PM IST

Bullet Train Update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट अंतर्गत १०३ किलोमीटर लांब वायडक्टच्या दोन्ही बाजुला २ लाखाहून अधिक नॉइज बॅरियर लावण्यात आले आहेत.

बुलेट ट्रेन संग्रहित छायाचित्र
बुलेट ट्रेन संग्रहित छायाचित्र

Mumbai Ahmedabad Bullet Train Update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत १०३   किलोमीटर लांब वायडक्टच्या दोन्ही बाजुला २ लाखाहून अधिक नॉइज बॅरियर लावण्यात आले आहेत. हे बॅरियर ट्रेनच्या तेज गतीमुळे येणारा आवाज बऱ्याच प्रमाणात कमी करण्यास मदत करतील.

१०३ किलोमीटर लांबीच्या या पुलाच्या दोन्ही बाजूला २ लाख ६ हजाराहून अधिक ध्वनी अडथळे बसवण्यात आले आहेत. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विवेककुमार गुप्ता यांनी सोमवारी ही माहिती दिली. प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर पुलाच्या दोन्ही बाजूला दोन हजार ध्वनी अडथळे बसविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संचालना दरम्यान रेल्वे आणि नागरी वास्तूंमुळे निर्माण होणारा आवाज कमी करण्यासाठी ध्वनी अडथळे डिझाइन केले गेले आहेत.

हे ध्वनी अडथळे रेल्वेच्या बाजूने निर्माण होणारा आवाज तसेच रुळांवर धावणाऱ्या चाकांमुळे निर्माण होणारा आवाज कमी करतात.  प्रत्येक ध्वनी अडथळ्याची उंची २ मीटर आणि रुंदी एक मीटर असते. त्याचे वजन सुमारे ८३० ते ८४० किलो असते. रहिवासी आणि शहरी भागात ३ मीटर उंचीपर्यंत ध्वनी अडथळे बसविण्यात आले आहेत. प्रवाशांना विनाअडथळा दृश्यांचा आनंद घेता यावा, यासाठी २ मीटर काँक्रीटच्या अडथळ्याच्यावर अतिरिक्त एक मीटर पारदर्शक पॉलीकार्बोनेट पॅनेलचा यात समावेश आहे.

२४३ किमीहून अधिक वायडक्टचे काम पूर्ण -

या अडथळ्यांच्या उभारणीसाठी ६ विशेष कारखाने उभारण्यात आले आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील तीन कारखाने अहमदाबादमध्ये आहेत, तर सुरत, वडोदरा आणि आणंद येथे प्रत्येकी एक कारखाना आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. २४३ किलोमीटरहून अधिक वायडक्टचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच पीअर फाऊंडेशनचे ३५२ किमी आणि पीअर फाऊंडेशनचे ३६२ किमीचे काम पूर्ण झाले आहे. १३ नद्यांवर पूल बांधण्यात आले असून, त्यात ५ पोलादाचे पूल आणि दोन प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट पूल आहेत, ज्यामुळे विविध रेल्वे मार्ग आणि महामार्गांची वाहतूक सुलभ झाली आहे.

बुलेट ट्रेनच्या ट्रॅकचे काम युद्धपातळीवर सुरू -

गुजरातमध्ये ट्रॅक उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. आणंद, वडोदरा, सुरत आणि नवसारी जिल्ह्यात आरसी ट्रॅक बेडचे बांधकाम सुरू आहे. ७१ किमी आरसी ट्रॅक बेडचे बांधकाम पूर्ण झाले असून वायडक्टवर रेल्वे वेल्डिंग सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाचा पहिला काँक्रीटबेस स्लॅब १० मजली इमारतीएवढा ३२ मीटर खोलीवर यशस्वीरित्या टाकण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटरच्या बोगद्याचे काम सुरू आहे. मुख्य बोगद्याचे बांधकाम सुलभ करण्यासाठी ३९४ मीटर लांबीच्या मध्यवर्ती बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. पालघर जिल्ह्यात न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करून ७ पर्वतीय बोगद्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. गुजरातमधील एकमेव पर्वतीय बोगदा यापूर्वीच यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या कॉरिडॉरवर १२ स्थानके आहेत, जी थीम-आधारित घटक आणि ऊर्जा-कार्यक्षम सुविधांसह डिझाइन केली गेली आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर