Budget 2025: १२ लाखापर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री; सोशल मीडियावर आला Memes चा महापूर, हसून होईल पुरेवाट
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Budget 2025: १२ लाखापर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री; सोशल मीडियावर आला Memes चा महापूर, हसून होईल पुरेवाट

Budget 2025: १२ लाखापर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री; सोशल मीडियावर आला Memes चा महापूर, हसून होईल पुरेवाट

Feb 01, 2025 04:22 PM IST

Budget Memes : १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर जल्लोषाचे वातावरण असून नेटिजन्सकडून मीम्सचा वर्षाव केला जात आहे. अर्थसंकल्पानंतर ट्विटर आणि इंस्टाग्रामवर मीम्सचा महापूर आला आहे.

सोशल मीडियावर आला Memes चा महापूर
सोशल मीडियावर आला Memes चा महापूर

Budget 2025 Memes : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात नव्या कररचनेनुसार १२ लाख रुपयांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली. दरम्यान अर्थसंकल्पात कोणाला काय मिळाले ही वेगळी गोष्ट आहे मात्र नेटीझन्स गंमतीशीर मीम्स तयार करून मध्यमवर्गाची चुटकी घेत आहेत. १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर जल्लोषाचे वातावरण असून नेटिजन्सकडून मीम्सचा वर्षाव केला जात आहे. अर्थसंकल्पानंतर ट्विटर आणि इंस्टाग्रामवर मीम्सचा महापूर आला आहे.

एका यूजरने एआय-जेनरेटेड इमेज शेअर केली आहे, त्यामध्ये निर्मला सीतारामण यांचा चेहरा बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या'कभी खुशी कभी गम'चित्रपटातील प्रसिद्ध सीनवर मॉर्फ केला आहे.

यूजर्स या निर्णयाचे स्वागत करताना "अब तो जिंदगी सेट हो गई" आणि "अर्थमंत्री महोदया, तुम्ही महान आहात!" सारखे मजेशीर कॅप्शनसह मीम्स शेअर करत आहेत.

अर्थसंकल्प सादर होताच सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होत आहे. लोक मजेशीर अंदाजात आपल्या करसंबधित समस्या व्यक्त करत आहेत. काही यूजर्सने सरकारकडून सवलतीची मागणी करत फनी मीम्स शेअर केले आहेत तर काहींनी वाढत्या कराची व्यथा व्यक्त केली आहे.

एका यूजरने लिहिले की, प्रत्येक वर्षी मी विचार करतो की, य़ावेळी करातून थोडा दिलासा मिळेल, मात्र बजेटनंतर पुन्हा जुनीच कहाणी!

 

तसेच आणखी एका युजरने फिल्मी डायलॉगचे मीम शेअर करताना लिहिले की, “हे सरकार आमचा टॅक्स हिसकावून घेऊन मात्र आमच्या इच्छा व आशा-आकांक्षा नाही!"

लोक आपली खुशी सोशल मीडियावर शेअर करत हेत. या व्हिडिओमध्ये लोक आनंदाने नाचताना दिसत आहेत.

बजेट केवळ टॅक्स पेयर्ससाठीच नव्हे तर महिला, तरुण, शेतकरी व वृद्ध नागरिकांसाठीही महत्वाचे मानले जाते. एक्सपर्ट्सच्या मतानुसार सरकारला सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे, जेणेकरून अर्थव्यवस्थेसोबतच लोकांची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.

 

दरम्यान आता पाहणे उत्सुकतेचे आहे की, या बजेटने कोणाला दिलासा मिळतो व कोणाच्या पदरी निराशा येते. तोपर्यंत सोशल मीडिया यूजर्स आपल्या अंदाजात सरकारपर्यंत आपले म्हणणे पोहोचवण्यासाठी अनोखा मार्ग शोधत राहतील.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर