Budget 2025: अर्थसंकल्प पीडीएफ फाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Budget 2025: अर्थसंकल्प पीडीएफ फाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Budget 2025: अर्थसंकल्प पीडीएफ फाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Feb 01, 2025 02:44 PM IST

Budget 2025 PDF Download: पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला.

अर्थसंकल्प पीडीएफ फाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
अर्थसंकल्प पीडीएफ फाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (१ फेब्रुवारी २०२५) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार ३.० चा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण काही कारणास्तव ऐकता आले नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. येथे आम्ही तुम्हाला केंद्रीय अर्थसंकल्प आणि संबंधित कागदपत्रे डाउनलोड करण्याच्या सोप्या टीप्स सांगत आहोत. दरम्यान, सर्व अर्थसंकल्पाची पीडीएफ फाईल डाउनलोड कसे करायचे, याबाबत जाणून घेऊयात.

असे करा डाउनलोड

१) सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइट www.indiabudget.gov.in. वर भेट द्या.

२) वेबसाईट ओपन झाल्यानंतर 'बजेट स्पीच' या सेक्शनमध्ये जा.

३) ज्या वर्षाचे बजेट तुम्हाला पाहायचे आहे, त्या वर्षाच्या टॅबवर क्लिक करा.

४) क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर डाऊनलोड लिंक असलेले पेज ओपन होईल.

५) बजेट स्पीचचे पीडीएफ डॉक्युमेंट (क्रोम ब्राउजर) डाऊनलोड करण्यासाठी वर उजवीकडे असलेल्या डाऊनलोड आयकॉनवर क्लिक करा.

मोबाईलवरून कसे डाउनलोड करायचे?

१) मोबाईलवर बजेट पीडीएफ पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला www.indiabudget.gov.in ही जावे लागेल.

२) तुम्हाला हवं असेल तर पेजच्या उजव्या बाजूला दिलेल्या 'डाऊनलोड मोबाईल अ‍ॅप्लिकेशन'वर टॅप करून ही तुमचं मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

३) आयफोन किंवा आयपॅड वापरकर्त्यांना अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आयकॉनवर टॅप करणे आवश्यक आहे.

४) अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर सेंट्रल बजेट ऑप्शन सर्च करा आणि ते डाऊनलोड करा.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांपासून करदात्यांपर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १२ लाखरुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी नवी योजना जाहीर करण्यात आली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पारंपरिक 'लेजर' पद्धतीच्या पिशवीत गुंडाळलेल्या डिजिटल टॅब्लेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपला आठवा अर्थसंकल्प सादर केला आहे. २०२१ मध्ये जागतिक महामारीचा फटका बसल्याने त्यांनी आपले भाषण आणि इतर अर्थसंकल्पीय कागदपत्रे घेऊन जाण्यासाठी पारंपारिक कागदांऐवजी डिजिटल टॅब्लेटचा वापर केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर