Budget 2025 Memes: बजेटआधीच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, हसून- हसून दुखेल पोट!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Budget 2025 Memes: बजेटआधीच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, हसून- हसून दुखेल पोट!

Budget 2025 Memes: बजेटआधीच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, हसून- हसून दुखेल पोट!

Jan 31, 2025 07:03 PM IST

Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा पाऊस पडत आहे.

बजेटआधीच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
बजेटआधीच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Union Budget 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी (०१ फेब्रुवारी) २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच अर्थसंकल्पाशी संबंधित मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

निर्मला सीतारामन उद्या सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषण करतील. या भाषणादरम्यान सीतारामन लोकसभेत आगामी आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतूद आणि महसुली अपेक्षांची रूपरेषा मांडतील. कनिष्ठ सभागृहातील त्यांच्या भाषणानंतर अर्थसंकल्पीय कागदपत्रे राज्यसभेत मांडली जातील. 

हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल. मध्यमवर्ग कर सवलतीची आणि व्यापारी वर्गाला जीएसटीच्या सोप्या रचनेची अपेक्षा असेल. या अर्थसंकल्प २०२५ मध्ये मध्यमवर्गीयांना संभाव्य करसवलतीची शक्यता वाढली आहे. मात्र, त्याआधीच अर्थसंकल्पावरील मीम्स आणि जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, घटते वेतन आणि वाढत्या किंमतींमुळे भारतीयांनी खरेदी रोखून धरल्याने सीतारामन वैयक्तिक प्राप्तिकरात कपात करतील आणि ग्रामीण भागाचे कल्याण करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा आणि राज्यसभेत २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करत यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात केली. राष्ट्रपती मुर्मू यांनी घोडेस्वार बग्गीतून संसदेत दाखल झाल्यानंतर आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रगीत झाले.

दोन महिन्यांपूर्वी आपण संविधान स्वीकारल्याची ७५ वर्षे साजरी केली आणि काही दिवसांपूर्वीच आम्ही आपला ७५ वर्षांचा प्रवास पूर्ण केला.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीतील इतर सर्वांना मी सर्व भारतीयांच्या वतीने नमन करतो, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर