Union Budget 2025 Live Updates: १२ लाखापर्यंत आयकर नाही, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Union Budget 2025 Live Updates: १२ लाखापर्यंत आयकर नाही, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ बाबत सर्व माहिती एका क्लिकवर
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ बाबत सर्व माहिती एका क्लिकवर

Union Budget 2025 Live Updates: १२ लाखापर्यंत आयकर नाही, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Ashwjeet Rajendra Jagtap 06:51 AM ISTFeb 01, 2025 12:21 PM
  • twitter
  • Share on Facebook

Union Budget 2025 Live: संसदेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडून महत्त्वाच्या घोषणा केल्या जात आहेत.

Sat, 01 Feb 202506:51 AM IST

Income Tax: १२ लाखापर्यंत आयकर नाही, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून आयकरात किती सुट मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, आजच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी काही दिले नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल. आता नवीन करप्रणालीत १२ लाखापर्यंत आयकर लागणार नाही.

Sat, 01 Feb 202506:35 AM IST

Budget 2025 Live: एलईडी, एलसीडी टीव्हीच्या किमती कमी होतील

अर्थमंत्र्यांनी एलईडी आणि एलसीडी टीव्हीवरील सीमाशुल्क २.५% पर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती कमी होतील. लिथियम आयन बॅटरी स्वस्त होतील. सरकार यामध्ये अधिक गुंतवणूक करेल.

Sat, 01 Feb 202506:23 AM IST

Budget 2025: अर्थसंकल्पात विमा क्षेत्राबाबत मोठी घोषणा

विमा क्षेत्राबाबत अर्थसंकल्पात १०० टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा १०० टक्के करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Sat, 01 Feb 202506:09 AM IST

Udan Yojana: 'उडान’ योजनेअंतर्गत १२० नवीन शहरांना विमान सेवेने जोडणार

'उडान’ योजनेअंतर्गत १२० नवीन शहरांना विमान सेवेने जोडले जाणार आहे, ज्याचा फायदा पुढील १० वर्षात ४ कोटी प्रवाशांना होईल. ईशान्येकडील राज्यांमध्ये छोटे विमानतळे आणि हेलीपॅडची उभारणी केली जाणार आहे.

Sat, 01 Feb 202505:58 AM IST

Kisan Credit Card: किसान क्रेडीट कार्डवरील कर्ज मर्यादेत वाढ

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात किसान क्रेडीट कार्डवरील कर्ज मर्यादेत ३ लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याची घोषणा केली.

Sat, 01 Feb 202505:55 AM IST

Union Budget LIVE Updates: भारताला जगभरातील खेळण्यांचे केंद्र बनवले जाईल- निर्मला सीतारामन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'भारत जगभरातील खेळण्यांचे केंद्र बनवले जाईल. याशिवाय, अन्न उत्पादन क्षेत्राचा येथे वेगाने विकास व्हावा, यासाठी अन्न उत्पादन अभियान चालवले जाईल. आमच्या वचनबद्धतेनुसार आम्ही हवामान अनुकूल विकास करू, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आम्ही तंत्रज्ञानाचे उत्पादन करू. आम्ही बॅटरी आणि सौर पॅनेल बनवण्याचा प्रयत्न करू. तिसरे इंजिन म्हणजे गुंतवणूक. आपण अर्थव्यवस्थेत, लोकांमध्ये गुंतवणूक करू.'

Sat, 01 Feb 202505:49 AM IST

Union Budget LIVE: अर्थसंकल्पात पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा

 

यंदाच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान कृषी योजनेची घोषणा करण्यात आली. राज्याच्या मदतीने ही योजना देशभरात राबवली जाणार आहे. या योजनेचा १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. १०० जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार.

Sat, 01 Feb 202505:49 AM IST

Union Budget: अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला बळ देणे सरकारचा हेतू- निर्मला सीतारामन

विकासदर वाढवणं, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं, भारतातल्या मध्यमवर्गाला बळ देणे या हेतूंनुसारच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले.

Sat, 01 Feb 202505:41 AM IST

Budget LIVE: अर्थमंत्र्याकडून अर्थसंकल्पाचे वाचन सुरू

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले आहे. 

Sat, 01 Feb 202505:25 AM IST

Union Budget LIVE: केंद्रीय मंत्रिमंडळाकडून २०२५ च्या अर्थसंकल्पाला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५ च्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री लवकरच संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.

Sat, 01 Feb 202505:04 AM IST

Union Cabinet Meeting: अर्थसंकल्पाआधीच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात

संसद भवन संकुलात मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या बैठकीत उपस्थित आहेत. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला जाईल. पगारदार वर्गालाही या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. कर स्लॅबमध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे.

Sat, 01 Feb 202504:46 AM IST

Share Market: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शनिवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स १३६.४४ अंकांनी वाढून ७७,६३७.०१ वर पोहोचला. दुसरीकडे, एनएसई निफ्टी २०.२ अंकांच्या वाढीसह २३,५२८.६० अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये सूचीबद्ध असलेल्या ३० कंपन्यांपैकी आयटीसी हॉटेल्स, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट आणि एनटीपीसी यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले.

Sat, 01 Feb 202504:45 AM IST

Union Budget  LIVE: अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी मंत्रालयात पोहोचले

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी अर्थ मंत्रालयात पोहोचले. आज दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्हाला सगळे कळेल. थोडा धीर धरा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. सकाळी १० वाजता मंत्रिमंडळाची बैठक होईल, ज्यामध्ये अर्थसंकल्प मंजूर केला जाईल, असे ते म्हणाले.

Sat, 01 Feb 202504:45 AM IST

Union Budget Live: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ निमित्त समुद्रकिनाऱ्यावर वाळू कलाकृती

ओडिशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावर वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ चे स्वागत करताना वाळू कलाकृती तयार केली. या वाळू कलाकृतीमध्ये पटनायक यांनी अर्थमंत्री सीतारमण दाखवले आहे.ते म्हणाले की,'देश आणि जगाचे लक्ष आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ वर आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेत सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.'

Sat, 01 Feb 202501:20 AM IST

Income Tax: आयकरात सवलत मिळण्याची आशा वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात सवलत मिळण्याची आशा वाढली आहे. विशेषतः कनिष्ठ मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पात काही दिलासा मिळू शकतो.

Sat, 01 Feb 202512:41 AM IST

FICCI: केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी एफआयसीसीआय अध्यक्षांनी काय म्हटले?

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी एफआयसीसीआय अध्यक्ष म्हणाले की, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीच्या बाबतीत, एफआयसीसीआयचा अंदाज सरकारच्या अंदाजापेक्षा थोडा जास्त आहे. परंतु, केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये वापर आणि गुंतवणूक मागणी दोन्ही वाढण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांना अधिक खर्च करण्यायोग्य उत्पन्न मिळावे, यासाठी कर रचनेत तर्कसंगत बदल करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

Sat, 01 Feb 202512:35 AM IST

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा वाढू शकते

किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा पाच लाखापर्यंत वाढवण्याची सरकारची तयारी आहे. सध्या किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कर्ज घेण्याची मर्यादा ३ लाख रुपये आहे.

Sat, 01 Feb 202512:34 AM IST

Budget 2025 Live: ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता

मोदी ३.० अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विम्याच्या हप्त्याची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. इतरांसाठी आरोग्य विम्याच्या हप्त्याची मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

Sat, 01 Feb 202512:33 AM IST

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता

देशाच्या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेच्या रक्कम वाढ केली जाण्याची  शक्यता आहे. बोफाच्या अहवालानुसार,  पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदतीची रक्कम वार्षिक १२ हजार रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात.

Sat, 01 Feb 202512:28 AM IST

Budget 2025 Live: केंद्र सरकार रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर भर देणार

अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. यानुसार, २०२५-२६ मध्ये जीडीपी वाढ ६.३ ते ६.८ टक्क्यांच्या दरम्यान असू शकते. हा अंदाज सरकारच्या आधीच्या अंदाजांपेक्षा कमी आहे. सर्वेक्षणात केंद्र सरकारने रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याबद्दल सांगितले आहे.

Sat, 01 Feb 202512:25 AM IST

Nirmala Sitharaman: सलग आठव्यांदा निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासूनच सुरू झाले आहे. मोदी सरकार आज लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार ३.० चा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासाठीही एक विक्रम असेल.