Union Budget 2024: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ०१ एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने पूर्ण बजेटप्रमाणे पायाभूत सुविधांवर भर दिल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली."आमच्या आधीच्या सरकारने अनेक दशकांपासून सामान्य माणसाच्या डोक्यावर ही एक मोठी टांगती तलवार ठेवली होती. ती आम्ही बाजूला केली”, असे सांगत मोदींनी देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नसून प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली.जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मध्यमवर्गीयांना नवीन गृहनिर्माण योजना मिळेल.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सरकार २ कोटी घरे बांधणार आहे. रूफटॉप सोलर प्रोग्रामद्वारे १० दशलक्ष घरांना मोफत वीज मिळेल. याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनाही आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट केले जाणार आहे.
भारताच्या वाढीसाठी ते महत्त्वाचे आहे, कॅपेक्स टार्गेट ११.१ टक्याने वाढवून ११.११ लाख कोटी रुपये केले आहे. मागील आर्थिक वर्षात २६.९९ लाख कोटी कर प्राप्त झाला होता. यावर्षी अंदाजे ३० लाख कोटी कर प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. लक्षद्वीपमधील पर्यटन विकासासाठी निधी दिला जाईल.
या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक ६.२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांकडून सुरक्षिततेसंदर्भात वाढता धोका लक्षात घेता हा धाडसी निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
सर्व जिल्ह्यांमध्ये रुग्णालये उभारण्याची सरकारची योजना आहे. आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य सुविधा सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवल्या जातील. ९- १४ वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस मोफत दिली जाईल.
उडान योजनेंतर्गत ५१७ नवीन विमान मार्ग सुरू करण्यात येणार आहेत.
सरकारने पुढील आर्थिक वर्षात काही मोठ्या योजनांची व्याप्ती वाढवली आहे. मनरेगा योजना ४३ टक्क्यांनी वाढवून ८६ हजार कोटी रुपये करण्यात आली. त्यानंतर आयुष्मान योजनेत ४.२ टक्यांनी वाढ करण्यात आली. या योजनेत ७ हजार ५०० कोटी रुपये गुंतवण्यात आले. याशिवाय, पीएलआय योजना ३३.५% ने वाढवून ६ हजार २०० कोटी रुपये करण्यात आली.
संबंधित बातम्या