BSF Recruitment : सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया-bsf recruitment 2024 head constable and assistant sub inspector jobs ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BSF Recruitment : सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया

BSF Recruitment : सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया

Jun 10, 2024 02:55 PM IST

Border Security Force Recruitment: सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी भरती सुरू आहे.

सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी!
सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी!

BSF Recruitment 2024: सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाईट rectt.before.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

भारतीय सीमा सुरक्षा दलात एकूण १ हजार ५२६ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे, ज्यात हेड कॉन्स्टेबलसह सीएपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीएसएफ पदांचा समावेश आहे. दरम्यान, ९ जून २०२४ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. तर, ९ जूलै २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बीएसएफद्वारा जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, सीआरपीएफ (३०३ पदे), बीएसएफ (२१९ पदे), आयटीबीपी (२१९ पदे), सीआयएसएफ (६४२ पदे), एसएसबी (८ पदे) आणि असम रायफल्ससाठी ३५ जागांवर भरती केली जाणार आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे. ही टेस्ट हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आयोजित केली जाणार आहे. याशिवाय, उमेदवारांना स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे. कम्प्युटर चाचणी उतीर्ण झालेल्या उमेदवारांची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिक एफीशिएंसी टेस्ट द्यावी लागेल. यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डिटेल्ड मेडिकल टेस्ट होईल. या सर्व प्रक्रियेनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

वय आणि अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. सीएपीएफ सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोग्राफी आणि हेड कॉन्स्टेबलसाठी उमेदवाराचे वय १८- २५ वर्षांच्या दरम्यान असावे. सहाय्यक उपनिरीक्षकाच्या पदांसाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा. याशिवाय, उमेदवारांनी टायपिंग केलेली असावी.

शैक्षणिक पात्रता

हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी उमेदवाराने बारावी उत्तीर्ण केलेली असावी आणि स्टेनोग्राफीचे कौशल्यही असावे. सहाय्यक उपनिरीक्षकाच्या पदांसाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा, तसेच टायपिंगमध्ये निपुण असावा.

  • अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाईला भेट द्यावी.