मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Crime : खळबळजनक ! दिल्लीत पुन्हा निर्भया कांड; १२ वर्षाच्या मुलावर अत्याचार; प्रकृती गंभीर

Delhi Crime : खळबळजनक ! दिल्लीत पुन्हा निर्भया कांड; १२ वर्षाच्या मुलावर अत्याचार; प्रकृती गंभीर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 27, 2022 01:02 PM IST

Delhi Crime : दिल्लीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मुलावर निर्भया घटनेसारखे अत्याचार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे.

दिल्ली क्राइम
दिल्ली क्राइम

दिल्ली : उत्तर पूर्व दिल्लीच्या न्यू सीलमपुर परिसरात एका १२ वर्षीय मुलावर निर्भया घटनेसारखे अत्याचार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या तीन मित्रांनी त्यांना मारहाण करत त्याच्यावर अत्याचार केले. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोक नायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पीडित मुलाच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

अल्पवयीन मुलाने त्रास होत असल्याने घटनेच्या दोन दिवसानंतर त्याच्यावर झालेल्या आत्याचाराची माहिती दिली. त्या नंतर  मुलाची स्थिती नाजुक असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सीलमपुर पोलिस ठाण्याच्या प्रमुख स्वाति मालीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो अतिदक्षता विभागात असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी दवाखान्यातून पोलिसांना मुलावर अत्याचार झाल्याची माहिती मिळाली. मुलाच्या पालकांनी देखील या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांचे एक पथक दवाखान्यात पोहचले असून मुलाच्या पालकांशी त्यांनी संवाद साधला. मात्र, पालक माहिती देण्याच्या मनस्थितीत नव्हते. यानंतर पोलिसांनी सखी नामक सामाजिक संघटनेशी संपर्क साधला. त्यांनी कौन्सिलरची व्यवस्था करून पालकांशी संवाद साधला यानंतर ते गुन्हा दाखल करण्यास तयार झाले.

पालकांचे समुपदेशन केल्यावर मुलाच्या आईने या प्रकरणी खुलासा करत पोलिसांत तक्रार दिली. १८ सप्टेंबर रोजी पीडित मुलाच्या तीन मित्रांनी त्याला जबर मारहाण करून त्याच्यावर अत्याचार केले. या तिघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ नुसार पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन आरोपींना अटक; तिसऱ्याचा शोध सुरू

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी दोन आरोपी मुलांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार आहे. दोन्ही आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना बाल न्याय बोर्डापुढे नेण्यात आले आहे. दिल्ली महिला आयोगाने य याप्रकरणी पोलिसांना नोटिस दिले आहे. तसेच कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग