मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नात्याला काळिमा.. बहिणीला स्मशानभूमीत सोडण्याची भीती दाखवून लैंगिक शोषण करत होता भाऊ; असा झाला खुलासा

नात्याला काळिमा.. बहिणीला स्मशानभूमीत सोडण्याची भीती दाखवून लैंगिक शोषण करत होता भाऊ; असा झाला खुलासा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 06, 2024 03:25 PM IST

Brother rape minor sister : रात्री स्मशानभूमीत सोडण्याची भीती दाखवून भावाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत सोडण्याची भीती दाखवून मामाचा २० वर्षीय मुलगा तिचे लैंगिक शोषण करत होता. अनेक वेळा तो अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत घेऊन गेला व तिला तेथे सोडूनही आला. तेथून मुलगी रडत रडत घरी आली होती. आरोपी सतत तिचा गैरफायदा घेत होता. ११ वर्षीय पीडितेने शुक्रवारी बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) समोर आपबिती सांगितली. 

पीडितेने सांगितले की, तुपुदाना येथे ती वडिलांच्या मामाच्या घरी राहतात. वडील मजुरी करण्यासाठी पंजाबला गेले आहेत. तर आई तिला व वडिलांना सोडून पळून गेली आहे. सीडब्ल्यूसीने मुलीला शेल्टर होममध्ये पाठवले आहे. सीडब्ल्यूसी रांचीमधील सदस्या अरुणा सिन्हा यांनी सांगितले की, मुलीला सध्या सीडब्ल्यूसीने संरक्षण दिले आहे. 

मुलीने सांगितले की, रात्री स्मशानभूमीत सोडण्याची भीती दाखवून मामाच्या मुलाने तिचे लैंगिक शोषण केल्याने ती रात्रभर झोपत नसे. भीतीने तिने ही गोष्ट घरच्या लोकांनी सांगितली नाही. एका दिवशी ती शाळेत गेल्यानंतर तिला डुलकी लागली. यावर शिक्षिकेने तिला रागावले व म्हटले की, रात्री घरी झोपत नाहीस का, तुझे डोळेच सांगत आहेत की तु झोपली नाहीस. त्यावर पीडितेने शिक्षिकेला आपला व्यथा सांगितली. त्यानंतर शिक्षिकेने मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले व तक्रार नोंदवली. त्यानंतर पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून प्रकरण सीडब्ल्यूसीकडे पाठवले.

पॉक्सोचे विशेष न्यायाधीश प्रभाकर सिंह यांच्या न्यायालयाने याप्रकरणी संजय रजक उर्फ भुट्टा रजक याला दोषी ठरवले आहे. यावर ६ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. पीड़ितेच्या तक्रारीनुसार संजय रजक याच्याबरोबर रघु रजक, फागु रजक, अशोक रजक व भक्तू रजक यांना आरोपी बनवले होते. मात्र पोलिसांनी केवळ संजयविरुद्ध आरोप पत्र दाखल केले होते.

WhatsApp channel

विभाग