Viral Video: एक मुलगा एका मुलीला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत.काहींनी हे दोघे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले. तर, काहींनी सांगितले की, दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत आणि एकमेकांवर प्रेम करतात. पण या व्हिडिओची वास्तविकता खूप वेगळी आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या १८ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एका मुलीला लाथा- बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. पण व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा आणि मुलगी बॉयफ्रेंड- गर्लफ्रेंड नसून भाऊ बहीण असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, हा व्हिडिओ भारतातील नसून मलेशियातील आहे. बहिणीच्या एका कृतीवर भावाला राग आवरता आला नाही आणि त्यामुळे त्याने तिला मारहाण केली.
हा व्हिडिओ मलेशियातील कोटा किनाबालु हॉस्पिटलमधील आहे. बहिणीने भावाला खोटे बोलून तिच्या आजारी आईला सोडून प्रियकराला भेटायला गेली होती. हा प्रकार भावाच्या लक्षात आल्यानंतर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. यानंतर त्याने रागाच्या भरात बहिणीला बेदम मारहाण केली. सुरुवातीला पोलीसही या घटनेबाबत कन्फ्यूज होते. नंतर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्य माहिती उजेडात आली.
महत्त्वाचे म्हणजे, ही घटना २०२२ मधील आहे. या घटनेला दोन वर्ष उलटली असून अचानक हा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होऊ लागला. अनेकांनी हा व्हिडिओ भारतातील असल्याचा दावा केला होता. मात्र, हा व्हिडिओ मलेशियातील असल्याचे स्पष्ट झाले.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. काहींनी भावाच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. तर, काही लोकांनी बहिणीला मारहाण करणाऱ्या भावाचे समर्थनही केले. काही लोक म्हणाले की अशा हिंसक वर्तनाला कोणत्याही प्रकारे समर्थन दिले जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे. तर, काहींनी सांगितले की, आजारी आईला एकटे सोडणे आणि तिच्याशी खोटे बोलणे चुकीचे आहे. पण भावाने बहिणीला असे मारले नव्हते पाहिजे.
अधिक व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी हिंदुस्थान टाइम्स मराठीच्या https://marathi.hindustantimes.com/topic/viral-news या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.