मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लग्नाच्या पहिल्याच दिवशी वहिनीला दीराने दिले असे गिफ्ट; पोलीस लागले मागे, कुटूंब संकटात

लग्नाच्या पहिल्याच दिवशी वहिनीला दीराने दिले असे गिफ्ट; पोलीस लागले मागे, कुटूंब संकटात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 13, 2024 09:19 PM IST

Crime News in Marathi : पोलिसांनी वहिनीला गिफ्ट देणाऱ्या दीराला अटक केली आहे. लग्न करून सासरी आलेल्या एका तरुणीला तिच्या दिराने गिफ्ट म्हणून गावठी कट्टा दिला होता.

वहिनीला रिव्हॉल्वर भेट दिल्याने दीराला अटक
वहिनीला रिव्हॉल्वर भेट दिल्याने दीराला अटक

सध्या लग्नाचा सीझन सुरू असून या निमित्ताने पाहुणे व नातेवाईक नव वधू वरांना विविध भेटवस्तू देत असतात. कोणी सोन्याचे दागिने देत असतो तर कोणी कपडे व भांडी. अनेकदा असे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये वधू-वराचे मित्र गंमत म्हणून लाटणे, झाड़ू, डायपर  आदि वस्तू देताना दिसतात. मात्र मध्य प्रदेश राज्यातील छतरपूरमध्ये एका दिराने आपल्या नवीन वहिनीला असे काही भेटवस्तू दिली की, यामुळे वहिनीसह संपूर्ण कुटूंब संकटात सापडले.

नवीन वहिनीला दीराने दिला गावठी कट्टा - 
पोलिसांनी वहिनीला गिफ्ट देणाऱ्या दीराला अटक केली आहे. लग्न करून सासरी आलेल्या एका तरुणीला तिच्या दिराने गिफ्ट म्हणून गावठी कट्टा दिला होता. वहिनीचे घरात स्वागत करताना दीराने हे खतरनाक शस्त्र हातात दिले. इतकेच नाही तर त्याने वहिनीला कट्टा देतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. फोटोमध्ये दीर व वहिनी हसताना दिसत आहेत.

पोलीस लागले मागे - 
हा प्रकार छतरपूर जिल्ह्यातील सिविल लाईन ठाणे क्षेत्रातील आहे. तरुणाने वहिनीला खुश करण्यासाठी गिफ्टमध्ये कट्टा दिला व याचा फोटो अपलोड केला. यानंतर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पोलिसांनी व्हायरल फोटोवर कारवाई सुरू केली. यामुळे संपूर्ण कुटूंब संकटात सापडले आहे. ज्या घरात लग्नाचा आनंद होता तेथे तरुणाच्या अटकेमुळे नाराजीचे वातावरण आहे.

याघटनेमुळे कुटूंबावर संकट आले आहे. नववधूचीही पोलीस चौकशी करू शकतात. एका पोलिसाने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर व्हायरल फोटोचाही तपास केला जात आहे.

WhatsApp channel

विभाग