madhya pradesh chhatarpur viral news : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लग्नात कुटुंबीय वर वधूला भेटवस्तु देत असतात. कुणी दागिने देतात, कुणी भांडी कपडे, तर कुणी पुष्पगुच्छ देतात. या विविध भेट वस्तूंचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. मात्र, मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एका दिराने आपल्या होणाऱ्या वहिनीला असे काही गिफ्ट दिले की ज्यामुळे संपूर्ण कुटुंब आता अडचणीत सापडले आहे. या कुटुंबियांच्या मागे आता पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दिराला अटक केली आहे.
मध्य प्रदेश पोलिसांनी या दिराला या प्रकरणी अटक केली आहे. एका वृत्त वहिनीने दिलेल्या वृत्तानुसार लग्न झाल्यानंतर सासरच्या घरी आलेल्या एका मुलीला तिच्या दिराने भेट म्हणून कट्टा दिला. वहिनीचे घरात स्वागत करताना त्याने गिफ्ट म्हणून अग्निशास्त्र दिले. हे पिस्तूल देतानाचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोमध्ये भाऊ आणि वहिनी हसताना दिसत आहेत. यांनी याच फोटोमुळे आता त्यांची डोकेदुखी वाढली आहे.
छतरपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन परिसरातील हे प्रकरण आहे. वहिनीला खूश करण्यासाठी तरुणाने पिस्तूल भेट दिले. ही भेट देतांनाचे फोटो त्याने सोशल मिडियावर अपलोड केले. हा फोटो उपलोड होण्याच्या काही कालावधीतच हा फोटो व्हायरल झाला. व्हायरल झालेला हा फोटो पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केल्याने आता संपूर्ण कुटुंब अडचणीत आले आहे. ज्या घरात लग्नाचा आनंद होता, त्या घरात तरुणाच्या अटकेनंतर दुःखाचे वातावरण पसरले आहे.
या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब संकटात सापडले आहे. लग्नानंतर सासरच्या घरी आलेल्या मुलीचीही पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोची ही चौकशी केली जात आहे.