Viral News: वय १७ अन् महिन्याला कमवतो १६ लाख रुपये; असा कोणता बिझनेस करतो? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: वय १७ अन् महिन्याला कमवतो १६ लाख रुपये; असा कोणता बिझनेस करतो? वाचा

Viral News: वय १७ अन् महिन्याला कमवतो १६ लाख रुपये; असा कोणता बिझनेस करतो? वाचा

Dec 10, 2024 01:44 PM IST

Business Tips: अवघ्या वयाच्या १७ व्या वर्षी एका मुलगा व्यवसायच्या माध्यमातून दर महिन्याला १६ लाख रुपये कमावत आहे.

वय १७ अन् महिन्याला कमवतो १६ लाख रुपये!
वय १७ अन् महिन्याला कमवतो १६ लाख रुपये!

Online Sticker Business: अनेकदा आपण सोशल मीडियावर (Social Media) असे व्हिडिओ पाहतो, ज्यामध्ये लोक त्यांच्या व्यवसायाबद्दल (Business Tips) सांगतात. अशा व्हिडिओमुळे नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेला लोकांना फायदा होतो. व्यवसाय करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? याबाबत पुरेसी माहिती नसल्याने अनेकजण अयशस्वी ठरतात. सध्या सोशल मीडियावर एका १७ वर्षीय मुलाची चर्चा होत आहे, जो दरमहा १६ लाख रुपये कमवितो. हा मुलगा असा कोणता व्यवसाय करतो? याबाबत जाणून घेऊयात.

कॅलन मॅकडोनाल्ड असे या मुलाचे नाव आहे, जो पर्सनलाइज्ड स्टिकर विकून दर महिन्याला १५ हजार पौंड म्हणजेच १६ लाख रुपये कमवतो. ख्रिसमसमध्ये त्याला कोणीतरी पर्सनलाइज्ड स्टिकर भेट दिली होती. त्यानंतर त्याने पर्सनलाइज्ड स्टिकर्सचा व्यवसाय करण्याची युक्ती सुचली. काही दिवसांनी त्याने स्वत:चा पर्सनलाइज्ड स्टीकर्स विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

'अशी' केली होती सुरुवात

मॅकडोनाल्ड ऑनलाइन स्टिकरचा व्यवसाय करतात. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, कॅलन मॅकडोनाल्डचा व्यवसाय प्रवास सुरू झाला जेव्हा त्याची आई, कॅरेन न्युझम हिने त्याला दोन वर्षांपूर्वी १५० पौंड (सुमारे १६ हजार रुपये) किंमतीचा क्रिकट जॉय भेट दिला, जे एक डिजिटल क्राफ्टिंग मशीन आहे. मॅकडोनाल्डने सुरुवातीला काचेच्या आणि ऍक्रेलिक वस्तूंसाठी स्टीकर्सचे डिझाइन करून फेसबूकवर शेअर केले. त्यानंतर काही दिवसांनी त्याला कमिशन मिळू लागले.

'असा' वाढवला व्यवसाय

मॅकडोनाल्ड सुरुवातीला कॉलेज आणि व्यवसाय दोन्ही सोबत करत होते. तो दिवसातून फक्त तीन तास काम करून २०० स्टीकर्स बनवायची. पंरतु, व्यवसाय वाढल्याने मॅकडोनाल्डला अर्ध्यातून शिक्षण सोडावे लागले. नंतर त्याने इंडस्ट्रियल-ग्रेड प्रिंटर खरेदी केला आणि आपला व्यवसाय वाढवला. २०२४ च्या जुलैपासून आतापर्यंत त्याने टिकटॉक शॉप आणि इतर प्लॅटफॉर्मवर सुमारे ७७ हजार पौंड म्हणजेच सुमारे ८३ लाख रुपयांची उत्पादने विकली आहेत. त्याला मिळालेली ही सर्वोत्तम ख्रिसमस भेट आहे, मॅकडोनाल्डने न्यूयॉर्क पोस्टला सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर