दिल्ली : ब्रिटनला जाणाऱ्यांसाठी एक खूश खबरी आहे. पूर्वीची व्हिसा मिळवण्याची किचकट प्रक्रिया आता आणखी सोपी केली जाणार आहे. या संदर्भात ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ब्रिटेनमध्ये जाण्यासाठी लागणारा व्हिसा हा आता १५ दिवसांत दिला जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय जलद आणि सोपी करण्याचा मानस असल्याचे देखील त्यांनी सांगितले. याचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना होणार आहे.
अलेक्स एलिस म्हणाले, इंग्लंडमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही गेल्यावर्षीच्या तुलनेत ८९ टक्यांनी वाढली आहे. तसेच कामासाठी येणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे त्यांना व्हिसा हा लवकरात लवकर मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ही प्रक्रिया वेगवान करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेत आहोत. या वर्षी ब्रीटेनला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ८९ टक्यांनी वाढली आहे. या सोबतच स्किलवर्कर यांना देखील आम्ही व्हिसा देत आहोत. या सोबतच पर्यटनासाठी येणाऱ्यांना देखील आम्ही व्हिसा देणार आहोत. व्हिसा देण्याची प्रक्रिया ही आम्ही वेगवान करणार आहोत. १५ दिवसांत व्हिसा मिळेल अशी व्यवस्था आम्ही निर्माण करणार आहोत.
कोरोना विषाणू आणि रशिया-यूक्रेन युद्धांमुळे ब्रीटेनला जाताना व्हिसा मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही नियम कठोर बनवण्यात आले होते. यामुळे नागरिकांना व्हिसा मिळवणे हे एक दिव्य काम होत होते. मात्र, याचा फटक हा भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना बसला होता. मात्र, आता ब्रीटेनमध्ये जणाऱ्यांची भारतीयांची संख्या बघता ही प्रक्रिया आणखी सोपी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे अलेक्स एलिस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या साठी दिल्ली येथील एक टीम योजना आखत असून आम्ही ही प्रक्रिया वेगवान करण्यासाठी ट्रॅक वर आहोत असे देखील अलेक्स एलिस म्हणाले. इंग्लंड मध्ये व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी अनेक सेंटर देखील उभारण्यात आली.
संबंधित बातम्या