मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : भर विमानात जोडप्याने गाठला निर्लज्जपणाचा कळस! प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की....

Viral News : भर विमानात जोडप्याने गाठला निर्लज्जपणाचा कळस! प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की....

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 13, 2024 11:50 AM IST

Viral News : मंगळवारी लंडन हिथ्रॉन येथून विमान डब्लिनसाठी रवाना झाले. या विमानात जोडप्याने भर विमानात २० मिनिटे एकमेकांसोबत अश्लील चाळे केले. या प्रकारामुळे विमानातील सहप्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भर विमानात २० मिनिटे एकमेकांसोबत अश्लील चाळे केले. या प्रकारामुळे विमानातील सहप्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भर विमानात २० मिनिटे एकमेकांसोबत अश्लील चाळे केले. या प्रकारामुळे विमानातील सहप्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Viral News : ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी विमान प्रवासादरम्यान एका जोडप्याने निर्लज्जपणाची हद्द ओलांडली. या जोडप्याने भर विमानात इतर प्रवाशांसमोर लैंगिक चाळे करत अश्लील कृत्य केले. काही संतप्त प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या जोडप्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि मुले देखील होती. असे असतांना त्यांनी त्यांचे अश्लील चाळे हे सुरूच ठेवले होते. या प्रकाराची तक्रार इतर प्रवाशांनी केली विमान क्रू कडे केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune loksabha EVM issue: पुणे जिल्ह्यात अनेक केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड! मतदान खोळंबले; संभाजीनगरमध्येही यंत्रात बिघाड

मिररमधील वृत्तानुसार, हे विमान मंगळवारी लंडन हेथरी येथून डब्लिनसाठी रवाना झाले होते. या विमानात कुटुंब आणि मुलांसोबत प्रवास करत असलेले एक जोडपे सुमारे २० मिनिटे एकमेकांसोबत अश्लील वर्तन करत होते. त्यांनी भर विमानात लैंगिक चाळे देखील केले. या विमानात प्रवास करणारी २६ वर्षीय फेराही ही या विमानात प्रवास करत होती, तिने वृत्तपत्राला सांगितले की, 'मी माझ्या भावसोबत प्रवास करत होते. यावेळी माझ्या बाजूला दुसऱ्या सीटवर असलेले जोडपे अश्लील चाळे करत असतांना दिसले. यामुळे मला कसेतरी झाले. फ्लाइटमध्ये तब्बल १५ ते २० मिनिटे दोघेही अश्लील कृत्य करत होते. भर विमानात इतर प्रवासी असतांना त्यांचे हे चाळे सर्व जण पाहत होते. हे दृश्य भयंकर होते. या फ्लाइटमध्ये लहान मुले आणि काही वृद्ध नागरिक देखील होते. त्यांच्या समोर हा सर्व घाणेरडा प्रकार सुरू होता. जेव्हा त्याला सीट बेल्ट लावण्यास सांगितले तेव्हा त्यांनी तसे न करता कपडे काढले आणि घाणेरडे कृत्य करत राहिले. हे सर्व अतिशय घृणास्पद होते.

Mumbai Local Train news : ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

प्रकरणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

फराने या प्रकरणाचा व्हिडिओही बनवला हे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. अहवालानुसार, या जोडप्याने स्कार्फने स्वतःला झाकले होते. मात्र, त्यामागून दोघे काय करत आहे, याची कुणकुण विमानातील सहप्रवाशांना लागली. जेव्हा हा प्रकार माझ्या लक्षात आला, तेव्हा फ्लाइटला ३८ मिनिटे बाकी होती. माझ्या भावासोबत सीटवर बसताना अशा गोष्टी पाहणे खूप लाजिरवाणे होते, असे फराने सांगितले.

वृत्तपत्रानुसार, ब्रिटीश एअरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'आमच्या केबिन क्रूला फ्लाइट दरम्यान या प्रकाराबाबत कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. जर या बाबत तक्रार करण्यात आली असती तर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असती.

IPL_Entry_Point

विभाग