UK Russia tensions : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता रशियाने आपला मोर्चा ब्रिटनकडे वळवला आहे. या बाबतकहा दावा स्वत: ब्रिटनने केला आहे. ब्रिटनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दावा केला की, रशियाचे लढाऊ व बॉम्बवर्षक विमाने त्यांच्या हवाई सीमेजवळ दिसले. यानंतर ब्रिटनने देखील रशियाला चोख उत्तर देण्यासाठी रॉयल एअर फोर्सची दोन टायफून विमानं तैनात केली. रॉयल एअरफोर्सने रशियन विमानांचा पाठलाग केला. यावेळी इंग्लिश चॅनेलमध्ये रशियन नौदलाची युद्धनौका तैनात असल्याचं पुढं आलं. या युद्धनौकांवर नजर ठेवण्यासाठी ब्रिटेनने देखील युद्धनौका तैनात केल्या आहेत. यामुळे आता दोन्ही देशात तणाव वाढला आहे.
रशियाने अलीकडच्या काळात पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि युरोपच्या आसपास - विशेषत: भूमध्य, बाल्टिक आणि उत्तर समुद्रात आपल्या लष्करी कारवाया तीव्र केल्या आहेत. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने नॉर्थ सी आणि इंग्लिश चॅनेलवर नजर ठेवून आहेत. यावेळी या परिसरात गुरुवारी रशियाच्या नौदलाच्या युद्ध नौका या ठिकाणी दिसल्या.
गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा रशियाची लष्करी विमाने आणि नौदलाची जहाजे ब्रिटनच्या सागरी हद्दीत आणि हवाई हद्दीजवळ आढळली आहेत, अशी माहिती ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. ब्रिटनचे सशस्त्र दलमंत्री ल्यूक पोलार्ड म्हणाले की, "आम्ही आमच्या देशाचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहोत. कोणत्याही प्रकारच्या कृतीला चोख उत्तर दिले जाईल.
ब्रिटनने रशियाच्या विविध कंपण्यांवर ५६ नवे निर्बंध लादले आहेत. मे २०२३ नंतर रशियावर लादण्यात आलेल्या सर्वात मोठ्या निर्बंधांचा हा एक भाग आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या युद्धयंत्रासाठी लागणाऱ्या उपकरणांचा पुरवठा खंडित करणे आणि आफ्रिकेतील रशियाच्या लष्करी गटांच्या भ्रष्ट कारवायांचा पर्दाफाश करणे हा या निर्बंधांचा उद्देश असल्याचं ब्रिटन सरकारने म्हटलं आहे.
ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी म्हणाले की, या निर्बंधांमुळे रशियावर अनेक मर्यादा येथील पुतीन यांनी यूक्रेनवर हल्ला करून तीन वर्ष होत आले आहे. हे युद्ध रोखण्यासाठी आम्ही रशियावर दबाव वाढवत आहोत. तसेच युक्रेनच्या जनतेच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला पाठिंबा देत राहीन.
सप्टेंबरमध्ये ब्रिटन हा नाटोचा पहिला सदस्य बनला ज्याने युक्रेनला रशियन हद्दीत ब्रिटीश क्रूझ क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी वॉशिंग्टन डीसीयेथे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. यानंतर रशियाने आपले आण्विक धोरण बदलून पाश्चिमात्य देशांना इशारा दिला की, रशिया आपल्या संरक्षणासाठी अण्वस्त्रांचा ही वापर करू शकतो.