Bridge Collapse : मध्यरात्रीच्या अंधारात नदीवरील पूल कोसळला; वाहनं नदीत पडून वाहून गेली…-bridge on kali river linking goa and karnataka collapses ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bridge Collapse : मध्यरात्रीच्या अंधारात नदीवरील पूल कोसळला; वाहनं नदीत पडून वाहून गेली…

Bridge Collapse : मध्यरात्रीच्या अंधारात नदीवरील पूल कोसळला; वाहनं नदीत पडून वाहून गेली…

Aug 07, 2024 08:36 PM IST

Bridge linking Goa and Karnataka collapses : गोवा आणि कर्नाटक राज्याला जोडणारा काली नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत काही वाहने नदीत पडून पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

गोवा-कर्नाटकला जोडणारा पूल कोसळला
गोवा-कर्नाटकला जोडणारा पूल कोसळला

kali river bridge karwar collapse : कर्नाटक आणि गोवा राज्यांना जोडणारा काली नदीवरील पूल काल, मध्यरात्री कोसळल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत पुलावरून जाणारा एक ट्रक नदीत कोसळून पुरात वाहून गेला असून ट्रक चालक बचावला आहे. ही घटना बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली आहे. ट्रक नदीत पडण्यापूर्वी किती वाहने नदीपात्रात पडली असावीत, याचा जलतरणपटूंच्या मदतीने पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक गोव्याहून कर्नाटकातील हुबळी शहराकडे जात होता. गोवा-कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या काली नदीच्या पुलावरून ट्रक जात असताना तुटलेल्या पुलावरून दुथडी वाहणाऱ्या नदी पात्रात कोसळला. ट्रक चालक बाळू मुरुगन (वय ३७) याने ड्रायव्हरच्या कॅबिनमधील विंडशील्ड तोडून आणि वाहनावर चढून पाण्यात बुडालेल्या ट्रकमधून टपावर आला. टपावरून त्याने मदतीसाठी आरडाओरडा केली असता महामार्गावरून गस्त घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले. पोलिसांनी तत्काळ ड्रायव्हरची सुटका करून कारवार येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती उत्तरा कन्नडा जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त कृष्णा प्रिया यांनी दिली. मुरुगनची प्रकृती सध्या स्थिर असून तो तामिळनाडूला परत जाण्यासाठी तयार झाल्यावर त्याला घरी पाठवले जाईल, असं कृष्णा प्रिया यांनी सांगितले.

४३ वर्षापूर्वी बांधलेला पूल

काली नदीवरील हा पूल ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. हा पूल तीन टप्प्यात कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले. पुलाचा पहिला भाग ट्रकसह नदीत कोसळला. पुलाचे उर्वरित दोन भाग दहा मिनिटांनंतर नदीत कोसळले, असं उत्तर कन्नडाचे पोलीस अधिक्षक एसपी नारायण यांनी सांगितलं. पूल कोसळल्याच्या घटनेनंतर बुधवारी सकाळी गोव्याला जोडणाऱ्या काली नदीवरील आणखी एका खालच्या पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. ‘गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्याने वाहतुकीची कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.’ असं नारायण यांनी पत्रकारांना सांगितलं. दरम्यान, बघ्यांची गर्दी टाळण्यासाठी परिसरातील सर्व पुलांवरील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. एकावेळी परवानगी असलेल्या वाहनांच्या संख्येवर मर्यादा घालून पुलावरील वाहतूक नियंत्रित केली जात असल्याचे नारायणन म्हणाले. गेल्या आठवड्याभर उत्तर कन्नडा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून काली नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहे.