Viral Video : स्वत:च्या लग्नात नवरदेव दारू पिऊन तर्राट; मग नवरीच्या आईनं जे काही केलं, त्याचं सर्वत्र कौतुक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : स्वत:च्या लग्नात नवरदेव दारू पिऊन तर्राट; मग नवरीच्या आईनं जे काही केलं, त्याचं सर्वत्र कौतुक

Viral Video : स्वत:च्या लग्नात नवरदेव दारू पिऊन तर्राट; मग नवरीच्या आईनं जे काही केलं, त्याचं सर्वत्र कौतुक

Jan 14, 2025 02:14 PM IST

Bengaluru Wedding Viral Video: बेंगळुरू येथे स्वत:च्या लग्नात नवरदेव दारू पिऊन तर्राट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ: स्वत:च्या लग्नात नवरदेव दारू पिऊन तर्राट
व्हायरल व्हिडिओ: स्वत:च्या लग्नात नवरदेव दारू पिऊन तर्राट

Viral News: सोशल मीडियावर सध्या एका लग्नाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यात स्वत:च्या लग्नात नवरदेव पिऊन तर्राट असल्याचे पाहायला मिळत आहे. नवरदेवाच्या अशा कृत्याने वधूची आई इतकी नाराज झाली होती की, तिने नवरदेवाच्या पाहुण्यांना भरमंडपातून माघारी जाण्याची विनंती केली. त्यावेळी एक लग्न मोडू नका असे सांगत असतानाही महिला आपल्या निर्णयावर ठाम राहते. महिलेने घेतलेल्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बेंगळुरू येथील आहे. स्वत:च्या लग्नात नवरदेव मद्यधुंद अवस्थेत लग्नाच्या ठिकाणी पोहोचला. नवरदेवाचे असे वागणे, नवरी मुलीच्या कुटुंबाला खटकले आणि त्यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. लग्नमंडपात आल्यानंतर नवरदेव विचित्र गोष्टी करत होता. तो इतका दारू प्यायला होता की, त्याने आरतीचे ताट फेकून दिली. सुरुवातीला नवरीच्या कुटुंबातील सदस्यांनी दुर्लक्ष केले. परंतु, जेव्हा मर्यादा ओलांडली गेली तेव्हा वधूच्या आईचाही राग अनावर झाला आणि तिने आपल्या मुलीचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये नवरीची आई नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांना माघार घेण्याची विनंती करताना दिसत आहे. नवरीची आई हात जोडून त्यांना परत जाण्यास सांगत आहे. 

नवरीच्या आईने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक

नवरदेव आणि त्याचे मित्र मद्यधुंद अवस्थेत लग्नाला आले आणि त्यांनी गोंधळ घातला, असे सांगितले जात आहे. मात्र, नवरदेवाने दारूच्या नशेत आरतीचे ताट जमिनीवर फेकल्याने नवरीच्या कुटुंबांना राग अनावर झाला. महिलेले आपल्या मुलीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि योग्य निर्णय घेतल्याचे सांगत नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कौतुकास्पद कमेंट येत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘जग काय म्हणेल याची चिंता न करता भारतीय स्त्रिया आपल्या मुलांसाठी सार्वजनिकरित्या कशा प्रकारे उभ्या राहतात, हे मला आवडते. आम्हाला याची अधिक गरज आहे’, आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, ‘मला वाटते की तिने आपल्या मुलीसाठी सर्वोत्तम केले. जर तो मद्यपान करत असेल आणि लग्नाच्या दिवशी योग्य वागत नसेल तर तो भविष्यात काय व्यवस्थित वागेल.’

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर