मी तुझ्या मुलाची आई होणार आहे..; मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचे बोलणं ऐकून पतीची सटकली, रागाच्या भरात केलं मोठं कांड
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मी तुझ्या मुलाची आई होणार आहे..; मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचे बोलणं ऐकून पतीची सटकली, रागाच्या भरात केलं मोठं कांड

मी तुझ्या मुलाची आई होणार आहे..; मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचे बोलणं ऐकून पतीची सटकली, रागाच्या भरात केलं मोठं कांड

Feb 01, 2025 08:56 PM IST

बदायूं येथे नवविवाहितेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. पोलिसांनी पती आणि सासूला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. पोलिस आणखी पाच जणांचा शोध घेत आहेत.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

यूपीतील बदायूं मध्ये एका नवविवाहितेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली असून फरार पाच जणांचा शोध सुरू केला आहे.  अटक केलेल्या पतीने पोलिसांना सांगितले की, लग्नापूर्वी त्याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. लग्नाच्या रात्री ती म्हणाली की, ती त्याच्या मुलाची आई होणार आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री हे ऐकून त्याला धक्का बसला आणि त्याने कुटुंबासह त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला.

हा सगळा प्रकार आलापूर शहरातील आहे. शाहजहांपूर येथील रहिवासी याद्रम यांचा १७ वर्षीय मुलगा पुष्पेंद्र याचा विवाह शाहजहांपूरमधील दाभौरा सिमरा गावातील रहिवासी राम निवास यांची मुलगी नारज हिच्याशी  २२ जानेवारी रोजी झाला होता. नीरजने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. रिलेशनशीपमध्ये असल्याने कुटूंबीयांनी दोघांचे लग्न लावून दिले होते. लग्नापूर्वीही दोघांमध्ये शारीरिक संबंध आले होते, पण ती गरोदर असल्याची माहिती तिने त्याला कधीच दिली नसल्याचे पुष्पेंद्र याने पोलिसांना सांगितले.

पतीने पोलिसांनी सांगितले की, लग्नाच्या रात्री त्याच्या पत्नीने त्याला सांगितले की ती अडीच महिन्यांची गरोदर आहे आणि त्याचेच मूल तिच्या गर्भात आहे. हे ऐकून सुरुवातीला तो स्तब्ध झाला. त्याचा विश्वासच बसत नव्हता. ही माहिती त्याने कुटुंबीयांना दिली. कुटुंबीय आणि आजूबाजूच्या लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली. त्याला सर्व प्रकार सहन न झाल्याने त्याने व त्याच्या आईने नववधूचा  गळा दाबून खून केला.

पीडितेच्या वडिलांनी तक्रार दाखल केली -

शाहजहांपूर जिल्ह्यातील गढिया रंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभौरा सिमरा गावातील रहिवासी रामनिवास यांनी आपली मुलगी नीरजच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने पती छज्जू उर्फ पुष्पेंद्र, सासू कांता, सासरे याद्रम, दीर रवी, नंनद अंजू,  चुलत सासरे लालाराम आणि दिनेश यांनी नीरजचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी कारवाई करत तिचा पती छज्जू आणि सासू कांता यांना अटक केली आहे. 

उर्वरित पाच आरोपी अद्याप फरार आहेत. नीरजचे वडील रामनिवास यांनी पोलिसांना सांगितले होते की, नीरज आणि छज्जू यांचा २२ जानेवारी रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी हुंड्याची मागणी करण्यासाठी नीरजला त्रास देण्यास सुरुवात केली.  मुलीच्या सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करू न शकल्याने सासरच्यांनी नीरजचा गळा दाबून खून केला, असा आरोप रामनिवास यांनी केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर