मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Bride Escaped With Bf Before Wedding In Jamui Bihar Today

Viral News : लग्नसोहळा सुरू असतानाच नवरी प्रियकरासोबत फरार; नवऱ्यासह वऱ्हाड मंडपातून परतलं

Jamui Bihar Viral News Today
Jamui Bihar Viral News Today (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Mar 15, 2023 06:04 PM IST

Viral News Today : मंडपात लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरी प्रियकरासोबत फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jamui Bihar Viral News Today : मंडपात लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरी प्रियकरासोबत फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील जमुईमध्ये ही घटना घडली असून नवरीच पळून गेल्यामुळं आनंदानं लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींना लग्न न लावताच घरी परतावं लागलं आहे. त्यानंतर आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. मंडपातून फरार झालेल्या नवरीचं गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, या प्रकरणाची तिच्या घरच्यांना माहिती असतानानी नवरी कुटुंबियांच्या हातावर तुरी देत फरार होण्यात यशस्वी झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या जमुई जिल्ह्यातील कल्याणपुरमध्ये आरती कुमारी या तरुणीचा लग्नसोहळा पार पडत होता. त्यासाठी नवऱ्यासह वऱ्हाड मंडपात आलेलं असतानाच नवरी प्रियकर अरविंद यादव याच्यासोबत फरार झाल्याचं तिच्या कुटुंबियांना समजलं. त्यानंतर मंडपात एकच गदारोळ झाला. नवऱ्याकडील मंडळींनी नवरीच्या कुटुंबियांवर संताप व्यक्त करत जेवणाविना घरी परतण्याचा निर्णय घेतला. याशिवाय लग्नाची सर्व तयारी तातडीनं थांबवण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांनी आरतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु तिचा शोध न लागल्यामुळं त्यांनी लग्नसोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

लग्नापूर्वीच मंडपातून नवरी प्रियकरासोबत फरार झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी मंगल कार्यालयात धाव घेत प्रकरणाची माहिती घेत चौकशी सुरू केली आहे. आरोपी प्रियकराच्या कुटुंबियांना पोलिसांनी बोलावून घेत त्यांचा जबाब नोंदवला आहे. याशिवाय पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.

WhatsApp channel