लग्न-वरात आणि वधू-वरांचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील, पण यावेळी यूपीतील प्रयागराज मधून समोर आलेल्या प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. येथे एका तरुणाने लग्न करून वधूला घरी आणले. मधुचंद्राच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी वधूला अचानक पोटात दुखू लागलं. सुरुवातीला वधूने वेदनेकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा वेदना वाढू लागल्या तेव्हा तिने सासरच्यांना याची माहिती दिली. सासरच्या मंडळींनी वधूला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तिची तपासणी करून ती गरोदर असल्याचे सांगितले. हे कळल्यावर नवऱ्याचा राग अनावर झाला. काही वेळातच वधूने मुलाला जन्म दिला. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ मुलीच्या कुटुंबीयांना बोलावून तिला मुलासह परत पाठवले.
हे संपूर्ण प्रकरण करछना परिसरातील एका गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी रोजी हा विवाह पार पडला होता. लग्नाचे सर्व विधी धुमधडाक्यात पार पडले आणि सकाळी वऱ्हाडी मंडळी आपआपल्या घरी परतली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारीला अनेक नातेवाईकही घरात थांबले होते. त्याच रात्री नवविवाहितेच्या पोटात अचानक दुखू लागले. घरातील लोकांनी काही घरगुती उपाय करायला सुरुवात केली पण काहीच फायदा न झाल्याने ते रात्री उशिरा सीएचसी करछना येथे पोहोचले.
डॉक्टरांनी तपासणी केली असता नवविवाहित महिलेच्या गर्भात नऊ महिन्यांचे बाळ असल्याचे सासरच्यांना समजले. त्यामुळे वेदना निर्माण झाल्या. थोड्याच वेळात बाळाचा ही जन्म होईल. हे ऐकून सासरच्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. दुसरीकडे, या घटनेनंतर नवरदेवही संतापला. त्याने तत्काळ सासरच्या लोकांना बोलावून घेतले आणि दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारी रोजी नवविवाहितेला नवजात अर्भकासह माहेरी पाठविण्यात आले. गावासह परिसरातील लोकांमध्ये हा चर्चेचा विषय आजही कायम आहे. सध्या कोणत्याही पक्षाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू आई होण्यावरून वधू-वर दोघांच्याही घरात गदारोळ माजला आहे. वधूच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, हे मूल नवरदेवाचे आहे. मे २०२४ मध्ये मुलीचे लग्न ठरले होते, तेव्हापासून वधू-वर भेटत होते, पण मुलगा हे नाकारत आहे. मुलाचे वडील म्हणतात की ते सुनेला घरात घेणार नाहीत. याबाबत पंचायतही घेण्यात आली, मात्र कोणताही निर्णय झालेला नाही.
संबंधित बातम्या