मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: गळ्यात वरमाला टाकताना नवरीनं केली नवऱ्याची थट्टा; पुढं विचारही केला नसेल असं घडलं

Viral Video: गळ्यात वरमाला टाकताना नवरीनं केली नवऱ्याची थट्टा; पुढं विचारही केला नसेल असं घडलं

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 20, 2024 06:41 PM IST

Viral Video: या लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Wedding Viral video
Wedding Viral video

bride and groom Viral Video: लग्नात कोणत्या कारणांवरून वाद होईल, याचा काही नेम नाही. एका लग्नातील अशाच एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नववधू गळ्यात वरमाला घालताना नवरदेवाची थट्टा करत आहे. मात्र, त्यानंतर नवरदेवाची तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो सगळ्यांसमोर नवरीला खाली ढकलून देतो. तसेच वरमाला जमीनीवर फेकून निघून जातो. हे पाहून लग्नात उपस्थित असलेले सगळेच लोक हैराण होतात.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सर्वात प्रथम वधू नवऱ्याला वरमाला घालते. त्यावेळी नवरदेव सरळ उभा राहून वरमालेचा स्वीकार करतो. मात्र, त्यानंतर नवरा मुलगा वधूला वरमाला घालण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी वधू पाठी सरकते. त्यानंतर दुसऱ्यांदाही तोच प्रकार घडतो. लग्नासाठी आतूर झालेला नवरदेव तिसऱ्यांदा वधूच्या गळ्यात वरमाला घालण्याचा प्रयत्न करतो. परंतु, यावेळीही वधू मागे सरकते. मात्र, यामुळे नवरदेवाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो सगळ्यांसर वधूला ढकलून देतो आणि वरमाला तिथेच टाकून निघून जातो. यावेळी घडलेल्या या प्रसंगामुळे लग्नात आलेले लोकही अचंबित झालेले दिसतात.

या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, वधूच्या अशा कृत्यामुळे नवरदेव नाराज झाला. तर, दुसऱ्या वापरकर्त्याने नवदेवाला मूर्ख म्हटले आहे. एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, व्हिडिओ पाहून मला हासू आवरता येत नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला असून बऱ्याच लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग