मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 8 August 2023 : राज्यसभेत गोंधळ घालणं भोवलं; ममता बॅनर्जींचा विश्वासू खासदार निलंबित
Live News Updates
Live News Updates (HT)

Live News Updates 8 August 2023 : राज्यसभेत गोंधळ घालणं भोवलं; ममता बॅनर्जींचा विश्वासू खासदार निलंबित

Ninad Vijayrao Deshmukh 05:41 PM ISTAug 08, 2023 11:11 PM
  • twitter
  • Share on Facebook

Rajya Sabha Live : राज्यसभेच्या सभापतींनी आणि तृणमूलचे गटनेते डेरेक ओब्रायन यांना अधिवेशन काळापुरतं निलंबित केलं आहे.

Tue, 08 Aug 202305:41 PM IST

मुंबईकरांना खुशखबर.. १० टक्क्यांची पाणी कपात बुधवारपासून रद्द, तलावांत ८० टक्के पाणीसाठा

मुंबई महानगरला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जुलैमध्ये जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये कायम राहिल, असा अंदाज आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठ्यात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात रद्द केली जात आहे. उद्या (बुधवार, ९ ऑगस्ट) पासून मुंबईकरांची पाणीकपातीपासून सुटका होत आहे. 

Tue, 08 Aug 202302:18 PM IST

नितीन देसाई आत्महत्या प्रकरण: गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींची उच्च न्यायालयात धाव

कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी नावीन अपडेट समोर आली आहे. आरोपी राजकुमार बंसल आणि रसेश शहा यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलीये. गुन्हा दाखल करताना पोलिसांनी आपली बाजू जाणून न घेताच कारवाई केली असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

Tue, 08 Aug 202311:28 AM IST

Maharashtra Congress Padyatra : महाराष्ट्र काँग्रेस काढणार पदयात्रा, नाना पटोले यांची माहिती

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरू होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Tue, 08 Aug 202306:42 AM IST

Western Railway : चर्नी रोड-चर्चगेट दरम्यान सिंग्नल यंत्रणेत बिघाड पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Western Railway : चर्नी रोड-चर्चगेट दरम्यान, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळी विस्कळीत झाली. येथील गाड्या या १० ते १५ मिनिटे उशिरा धावत असल्याने नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यास उशिर होत आहे

Tue, 08 Aug 202306:38 AM IST

Rajya Sabha : राज्यसभेत गोंधळ घालणं भोवलं; ममता बॅनर्जींचा विश्वासू खासदार निलंबित

Rajya Sabha Live : राज्यसभेचं कामकाज सुरू असताना गोंधळ घालणं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू खासदाराला चांगलंच महागात पडलं आहे. राज्यसभेच्या सभापतींनी आणि तृणमूलचे गटनेते डेरेक ओब्रायन यांना अधिवेशन काळापुरतं निलंबित केलं आहे.

Tue, 08 Aug 202304:29 AM IST

Opening Bell : सेंसेक्स निफ्टीची सुरूवात निराशाजनक, तिमाही निकालावर लक्ष

आज मंगळवारी शेअर बाजाराची सुरूवात निराशाजनक दिसत आहे. सेंसेक्समध्ये ५६.३० अंशांची घट नोंदवत तो ६५,८९६.७९ अंश पातळीवर खुला झाला. निफ्टीसुद्धा ०.८० अंशांच्या घसरणीसह १९५९३.३० अंश पातळीवर खुला झाला. आज अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन कंपनी, सिप्ला या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत.

Tue, 08 Aug 202301:44 AM IST

Crime News: पाच कोटींच्या फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक

Shailaja Darade Crime News: महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना पाच कोटींच्या फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Tue, 08 Aug 202301:44 AM IST

Manipur violence : मणिपूरच्या आदिवासी संघेटनेचे प्रतिनिधी घेणार अमित शाह यांची भेट

मणिपूरच्या आदिवासी संघेटनेचे प्रतिनिधी आज दिल्लीत जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मणिपूरच्या हिंसाचारामध्ये कुकी-जो समाजातील जे व्यक्ती मारले गेले आहेत त्यांच्या सामूहिक दफनविधीसह पाच प्रमुख मागण्यांवर विचार करण्याची विनंती करण्यात येणार आहे.

Tue, 08 Aug 202301:44 AM IST

Loksabha : संसदेच्या परिसरात युवक काँग्रेसचं आंदोलन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. संसदेच्या परिसरात युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे. वाढता द्वेष, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर युवक काँग्रेसकडून सरकारच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहे.

Tue, 08 Aug 202301:43 AM IST

Delhi : महाराष्ट्र आणि गोव्यातील खासदारांची बैठक

दिल्लीमध्ये आज महाराष्ट्र सदनात संध्याकाळी ७  वाजता एनडीएच्या खासदारांची बैठक होणार आहे. यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या खासदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत.  

Tue, 08 Aug 202301:17 AM IST

delhi : अविश्वासाच्या प्रस्तावावर लोकसभेत होणार चर्चा

मोदी सरकारच्या विरोधात आणण्यात आलेल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर लोकसभेत आज लोकसभेत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर त्यांनी सोमवारी अधिवेशनात सहभाग घेतला. लोकसभेत सादर होणाऱ्या अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी चर्चेला सुरुवात करणार आहेत.  

Tue, 08 Aug 202312:44 AM IST

RBI : आरबीआयच्या पतधोरण समितीची आज बैठक; व्याज दारवाढीकडे सर्वसामान्यांचे लक्ष

RBI : आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. मागील दोन महिन्यात महागाईत झालेली वाढ, भाजीपाला, डाळींच्या किंमतीत झालेली वाढ आणि अमेरीकेच्या फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा एकदा व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पतधोरण समिती व्याजदर वाढीसंदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.