मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर उलटला, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटला. पुण्याकडे जाणारी वाहतूक काही वेळापासून ठप्प आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. कंटेनर बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे.
ठाण्यात बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष कार्यालयाचे उद्घाटन
दहा दिवसांपुर्वी अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आलेला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयाचे उद्घाटन सोहळा क्रांतीदिनी म्हणजेच बुधवार, ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठाण्यात येणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.
Sandipan Bhumre : बैठकीतला राडा नेमका कशामुळं झाला?, मंत्री संदीपान भुमरे काय म्हणाले...
Ambadas Danve vs Sandipan Bhumre : औरंगाबादेतील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्यात शाब्दिक वादावादी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता मंत्री भुमरे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत म्हटलंय की, विरोधकांना किती निधी मिळाला, यापेक्षा कोणत्या तालुक्यांना किती निधी मिळाला?, यावर बोलणं गरजेचं आहे. आम्ही सर्व तालुक्यांना समान निधी देत असल्याचंही मंत्री संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे.
Aditya Thackeray : आमचं सरकार आल्यास टोलनाके बंद करू; आदित्य ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासन
Aditya Thackeray News Today : आगामी विधानसभा निवडणुकीत आमची सत्ता आल्यास मुंबईतील टोलनाके बंद करू, असं आश्वासन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलं आहे. आपण मुंबईकर म्हणून टोल भरतोय, परंतु लोकांच्या प्रश्नाकडे पाहण्यासाठी घटनाबाह्य सरकारला वेळ नाही. हे सरकार पडल्यानंतर आमचंच सरकार येणार आहे. त्यानंतर आम्ही मुंबईतील टोलनाके बंद करणार असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
प्रवाशांना ठार करणारा आरोपी रेल्वे जवानाच्या पोलीस कोठडीत ११ ऑगस्टपर्यंत वाढ
धावत्या मुंबई-जयपूर ट्रेनमध्ये ४ प्रवाशांना गोळ्या घालून ठार मारणारा रेल्वे पोलीस दलाचा जवान चेतन सिंहच्या पोलीस कोठडीत ११ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली. आरोपी जवान चेतन सिंहने ३१ जुलै रोजी टिकाराम मीना, अब्दुल कादर, असगर शेख आणि सय्यद सैफुद्दिन यांना गोळ्या घालून ठार केले होते.
Aadar Poona Wala : सायरस पुनावाला समुहाच्या धोरण सल्लागारपदी केकी मिस्त्री यांची नियुक्ती
फार्मास्युटीकल्स, बायोटेक्नोलॉजी, वित्त, स्वच्छ उर्जा, आदरातिथ्य, बांधकाम क्षेत्र, हवाई वाहतूक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सायरस पूनावाला समूहाने श्री.केकी.मिस्त्री यांची धोरण सल्लागार म्हणून निवड केली आहे. केकी मिस्त्री यांनी एचडीएफसी लिमिटेडचे सीईओ आणि व्हॉईस चेअरमन हे पद भूषविलेले आहे. श्री.केकी मिस्त्री हे अदार पूनावाला यांच्या सर्व आर्थिक उपक्रम सेवांसाठी धोरण सल्लागार म्हणून काम करतील.
Delhi AIIMS Fire : दिल्लीत AIIMS रुग्णालयात अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी
Delhi AIIMS Hospital Fire : दिल्ली येथील AIIMS रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दलाचे आठ बंब दाखल झाले आहे.
Pune : रास्त भाव दुकान परवान्यांसाठी १ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत
पुणे ग्रामीण मधील १३ तालुक्यांमध्ये २४१ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास १ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे ग्रामीणमध्ये दौंड, बारामती, इंदापूर, मावळ, मुळशी, शिरुर, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यातील एकूण २४१ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा १ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातील काही भागातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता नवीन शिधावाटप, रास्त भाव दुकान मंजुरीसाठीच्या सहामाही कालबद्ध कार्यक्रमास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी कळविले आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी पूर्ववत; कॉंग्रेसमध्ये आनंद
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने आज कॉंग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी पूर्ववत केली. यावेळी I.N.D.I.A आघाडीच्या नेत्यांनी पेढे भरवून असा आनंद साजरा केला.
प्रकाश आंबेडकर आज अक्कलकोटमध्ये मोर्चा काढणार
अक्कलकोट शहरात आज, सोमवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा. राज्यात दलित, मुस्लिम, ओबीसी आणि इतर अल्पसंख्यांक समूहावर होणाऱ्या अन्याय, अत्याचारा विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून 'जनआक्रोश सभे'चं आयोजन
ITR filings : यंदाच्या वर्षी ३१ जुलैपर्यंत ६.७७ आयटीआर प्रक्रिया पूर्ण
आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ३१ जुलैपर्यंत रेकाॅर्ड ६.७७ आयकर रिटर्न्स भरले आहेत. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या समान कालावधीत ५.८३ कोटी रिटर्न्सपेक्षा १६.१ टक्के अधिक आहे. ३१ जुलैपर्यंत यावेळी ५३.६७ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पहिल्यांदा आयटीआर फाईल केले आहेत.
Opening Bell : सेन्सेक्स निफ्टीची वाढीसह सुरूवात, पेटीएम शेअरमध्ये ११ टक्के वाढ, अदानी शेअर्स ८ टक्के घसरला
देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारात वाढ झाली. BSE-आधारित 30 शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) 145.59 अंकांच्या किंवा 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 65,866.84 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, NSE निफ्टी 40.65 अंकांच्या म्हणजेच 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 19,557.65 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. आज सुरुवातीच्या व्यवहारात पेटीएमच्या शेअरमध्ये 11 टक्क्यांपर्यंत उसळी आली. त्याच वेळी, अदानी ग्रीनमध्ये 8% पर्यंत नुकसान दिसले.
Dadar Car Accident : दादरमध्ये धावत्या कारला भीषण आग, टिळक पुलावरील वाहतूक बंद
Dadar Car Accident : मुंबईच्या दादरमध्ये मध्यरात्री भरधाव कारला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jejuri: जेजूरीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम; बारामती-सासवड मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद
Jejuri Shasan aplya dari : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील या कार्यक्रमाला येणार आहेत. यामुळे बारामती ते सासवड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Weather Forecast : राज्यात पावसाने दिली उघडीप; मुंबईसह राज्यात पुढील ७ दिवस असे असेल हवामान
राज्यात पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेतणार आहे. कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहून काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
highcourt : गौतम नवलखा आणि महेश राऊत यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवर आज सुनावणी
शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा आणि महेश राऊत यांनी त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याकरता हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी.
Gadchiroli News : गडचिरोलीतील सुरजागड लोहखनिज प्रकल्पात जेसीबी जीपवर कोसळल्याने ३ ठार
Gadchiroli Surjagarh Mining Project: गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह प्रकल्पाच्या खाणीत खोदाई करणारा मोठा जेसीबी डोंगरावरून खाली असणाऱ्या जीववर कोसळल्याने अभियंत्यासह तिघे ठार झाले.
mumbai : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्याकरता ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं संजय आणि प्रवीण राऊत यांना दिलेला जामीन अयोग्य असल्यानं तो रद्द करावा अशी ईडीची मागणी. आज ईडीचा युक्तिवाद संपण्याची शक्यात. प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊतांपर्यंत काळापैसा पोहचल्याचा ईडीचा दावा.
delhi : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेत अमित शाह सादर करणार आहेत, यावर दुपारी २ वाजल्यापासून चर्चेला सुरूवात होईल. अविश्वास प्रस्ताव, दिल्ली सेवा विधेयकामुळे पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
mumbai : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा पाचवा दिवस
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ३ ऑगस्टपासून सुरू असलेल्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. सोमवार असल्यामुळे बसअभावी नोकरदारांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
Pune : जेजूरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आज पुण्यात
जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रम हा चार वेळा रद्द झालेला कार्यक्रम आज पार पडणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज पुण्यात असतील. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आधी जेजुरी गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेणार आहेत, त्यानंतर दुपारी 1 वाजता जेजुरीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे.
Chandrayaan 3: चंद्राचं रूप दिसलं! चांद्रयान ३ यानाने पाठवलं पहिलं छायाचित्र; 'ऑर्बिट रिडक्शन' प्रक्रिया यशस्वी
ISRO Published Moon Photos: चांद्रयान ३ ची रविवारी रात्री ११ वाजता इस्रोने 'ऑर्बिट रिडक्शन' प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. यान चंद्राच्या आणखी जवळ गेले असून या यानाने पहिला पहिला फोटो आणि व्हिडिओ इस्रोला पाठवला. हा व्हिडिओ आणि फोटो इस्रोने ट्विटर पेजवर प्रसिद्ध केला आहे.
Manipur violence : मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Manipur violence : आज मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासाठी न्यायालयाने राज्याच्या डीजीपींना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाने राज्य सरकारला सुमारे ६५०० एफआयआरचे वर्गीकरण करून चार्ट तयार करण्यास सांगितले आहे. खून, बलात्कार, दरोडा, महिलांशी गैरवर्तन, धार्मिक स्थळांचं नुकसान अशा गंभीर प्रकरणांशी संबंधित किती एफआयआर आहेत, हे सांगण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची समिती स्थापन केली जाऊ शकते, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. सकाळी ११ वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे.
विभाग