Live News Updates 5 August 2023: महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे निधन
Prataprao Borade: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत,महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त,विद्या प्रतिष्ठान,बारामतीचे माजी प्रशासकीय अधिकारी, ऋषीतुल्य विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आज दुःखद निधन झाल्याची बातमी समजली.
Sat, 05 Aug 202310:55 AM IST
Prataprao Borade: महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे निधन
Prataprao Borade: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत,महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त,विद्या प्रतिष्ठान,बारामतीचे माजी प्रशासकीय अधिकारी, ऋषीतुल्य विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आज दुःखद निधन झाल्याची बातमी समजली. मागील पाच दशके प्रतापरावांचा आणि माझा स्नेह होता.जगभरात एखादा देश क्वचितच आढळेल जिथे त्यांचा विद्यार्थी सापडणार नाही.आपल्या ज्ञानदानाने व उत्तम प्रशासकीय कौशल्याने त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था नावारूपास आणल्या.राज्यातील अनेक परिवर्तनवादी संघटना व संस्था यांच्यासोबत त्यांचा संवाद होता.मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ते आग्रही होते.आज त्यांच्या निधनाची बातमी ही मला वैयक्तिक वेदनादायी आहे.त्यांच्या कुटुबियांना व एमजीएम परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशा आशयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट केले आहे.
Sat, 05 Aug 202308:49 AM IST
सामाजिक कार्यकर्ते वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांची तळोजा कारागृहातून सुटका
भीमा-कोरेगाव प्रकरणात गेली ५ वर्ष तुरुंगात असलेले सामाजिक कार्यकर्ते वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना २८ जुलै रोजी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर आज, शनिवारी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून त्यांची सुटका झाली.
पाच वर्षानंतर सुटका...
— Hindustan Times Marathi (@htmarathi) August 5, 2023
भीमा-कोरेगाव प्रकरणात गेली ५ वर्ष तुरुंगात असलेले सामाजिक कार्यकर्ते वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना २८ जुलै रोजी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर आज, शनिवारी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून त्यांची सुटका झाली. pic.twitter.com/nE2H5RSqr8
Sat, 05 Aug 202308:39 AM IST
‘इंडिया’ आघाडीची मुंबईत बैठक; नियोजनासाठी मविआची बैठक
मुंबईत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या INDIA आघाडीतील पक्षांच्या बैठकीचे नियोजन करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
मुंबईत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या INDIA आघाडीतील पक्षांच्या बैठकीचे नियोजन करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. #India pic.twitter.com/0KbbFOJuDR
— Hindustan Times Marathi (@htmarathi) August 5, 2023
Sat, 05 Aug 202307:34 AM IST
पवना धरण ९४ टक्के भरले; पण पिंपरी-चिंचवडसाठी दिवसाआडच पाणीपुरवठा
पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात ९४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाल्यानंतर आता दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे. मात्र, महापालिकेने पाणीपुरवठा दिवसाआडच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Sat, 05 Aug 202305:03 AM IST
Encounter In Kulgam : कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद; लष्कराची शोध मोहीम सुरूच
Encounter In Kulgam : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन सुरक्षा जवान शहीद झाले. दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू आहे, यात पोलिसांचाही सहभाग होता.
Sat, 05 Aug 202303:20 AM IST
mumbai : म्हाडा प्राधिकरणांतर्गत इमारत पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची कमतरता असल्यास त्याचा वित्त आणि गृहनिर्माण विभागाच्या मंत्री आणि सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर म्हाडा प्राधिकरण अन्यथा शासनामार्फत पुढील अधिवेशनात तरतूद करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले.
Sat, 05 Aug 202303:13 AM IST
Pune : 'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत' जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन
'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता जेजुरी ता. पुरंदर येथे आयोजन करण्यात आले आहे.
Sat, 05 Aug 202303:12 AM IST
Pune : केंद्र शासनाने सहकारी संस्थांबाबत घेतलेल्या निर्णयांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी : सहकार आयुक्त अनिल कवडे
केंद्र शासनाने सहकारी संस्थांबाबत अनेक मोठे निर्णय घेतले असून त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये चांगल्याप्रकारे करण्यात येत आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्वावलंबी व्हाव्यात आणि कार्यक्षमपणे काम कराव्यात यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली आहे.
Sat, 05 Aug 202302:30 AM IST
mumbai : महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक
लवकरच राज्यात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीच्या अनुषंगाने नेहरू तारांगण येथे सकाळीमहाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक शरद पवार यांनी बोलावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र शरद पवार यांनी आपण वारंवार महाविकास आघाडीच्या सोबतच आहोत याची स्पष्टता दिली आहे.
Sat, 05 Aug 202302:30 AM IST
nashik : महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा १२२ वा दीक्षांत समारंभ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा १२२ वा दीक्षांत समारंभ संपन्न होत आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. ३४९ पुरुष आणि १४५ महिला आणि गोवा राज्याचा १ असे एकूण ४९४ पोलीस उपनिरीक्षकानी खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आहे.
Sat, 05 Aug 202302:28 AM IST
Pune : संभाजी भिडेंच्या मुद्यावरून पुण्यात आज राडा?
संभाजी भिडे यांच्या समर्थकांकडून सकाळी बालगंधर्व चौकात भिंडेच्या समर्थनार्थ आंदोलन आणि भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यास परवागी द्यावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आलीय. याला भीम आर्मीकडून विरोध करण्यात आलाय.
Sat, 05 Aug 202302:27 AM IST
Pune Crime : रक्त पिण्यासाठी मित्राच्या गळ्याचा कडाडून चावा; रक्त पिणार का? म्हणत दुसऱ्याने केली दगडाने ठेचून हत्या
Pune bhosari murder : पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत मित्राने रक्त पिण्यासाठी मित्राच्या गळ्याचा कडाडून चावा घेतला. तर दुसऱ्या मित्राने रक्त पिणार का? म्हणत त्याची दगडाने ठेचून हत्या केली.
Sat, 05 Aug 202302:27 AM IST
Pune ZP Job : पुणे जिल्हा परिषदेतील एक हजार पदांच्या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू
Pune ZP Job opprtunity : पुणे जिल्हा परिषदेच्या तब्बल १ हजार जागांसाठी सरळ सेवा भरती अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याची सुरुवात आज पासून होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी दिली.
Sat, 05 Aug 202302:27 AM IST
Maharashtra Rain : रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; असे राहील आजचे हवामान, वाचा अपडेट
Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
Sat, 05 Aug 202312:59 AM IST
Bhandara : भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, गोसीखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व 33 गेट उघडले, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु
भंडारा जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन हात आहेत. नदी, नाले आणि धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. जोरदार पावसामुळं गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व ३३ गेट उघडले आहेत. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
Sat, 05 Aug 202312:18 AM IST
Amrit Bharat Station Scheme : देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या होणार पुनर्विकास; राज्यातील ४४ स्थानकांचा समावेश
Amrit Bharat Station Scheme : अमृत भारत योजने अंतर्गत भारतातील ५०८ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश आहे. तर पुण्यातील चार स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे.