Live News Updates 25 June 2023 : मॉस्कोमधील परिस्थिती चिघळली, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी, दहशतवाद विरोधी कायदा लागू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 25 June 2023 : मॉस्कोमधील परिस्थिती चिघळली, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी, दहशतवाद विरोधी कायदा लागू
Live Blog
Live Blog

Live News Updates 25 June 2023 : मॉस्कोमधील परिस्थिती चिघळली, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी, दहशतवाद विरोधी कायदा लागू

Ninad Vijayrao Deshmukh 01:25 PM ISTJun 25, 2023 06:55 PM
  • twitter
  • Share on Facebook

Wagner Rebellion: वॅगनर ग्रुपनं बंड केल्यानंतर मॉस्कोमधील परिस्थिती चिघळली आहे. अशात मॉस्कोमध्ये दहशतवादी विरोधी कायदा लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय सोमवार नॉन वर्किंग दिवस असेल, असे मॉस्कोच्या महापौर सर्गेई सोबयानिन यांनी सांगितलेय.

Sun, 25 Jun 202301:25 PM IST

GO First Airline :  गो फर्स्ट एअरलाईनला ४२५ कोटींचे कर्ज मंजूर

कर्जाच्या संकटाचा सामना करणाऱ्या गो फर्स्ट एअरलाइनसाठी दिलासा देणारी बातमी आहे. GoFirst ला कर्ज देणाऱ्या बँकांच्या कन्सोर्टियमने कंपनीला अंतरिम सवलत म्हणून ४२५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. गो फर्स्टचे कामकाज सुरू करण्यासाठी बँकांनी अंतरिम दिलासा म्हणून ४२५ कोटी मंजूर केले आहेत.  आता बँकेच्या बोर्ड आणि रेग्युलेटरकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे, त्यानंतर पुन्हा गो फर्स्टचे पुन्हा टेकआॅफ होऊ शकते. 

Sun, 25 Jun 202301:22 PM IST

Foxxcon :  फाॅक्सकाॅन कंपनी भारतातील गुंतवणूक करणार दुप्पट

तैवानची कंपनी फॉक्सकॉनने चीनबाहेर विस्तार करण्याची आक्रमक योजना आखली आहे. फॉक्सकॉनने तामिळनाडूमधील सुरुवातीची गुंतवणूक दुप्पट करण्यासोबतच कर्नाटक आणि तेलंगणामध्येही नवीन गुंतवणुकीची घोषणा केली आहे. 

Sun, 25 Jun 202310:29 AM IST

Bharat Petroleum :  भारत पेट्रोलियमच्या संचालक मंडळाची बैठक २८ जूनला

देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम उत्पादने विकणाऱ्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीची संचालक मंडळाची बैठक बुधवारी २८ जून रोजी होत आहे. या बैठकीत भांडवल ओतणे, राईट इश्यू यासह सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. कंपनी एनर्जी ट्रान्झिशन, नेट झिरो आणि एनर्जी सिक्युरिटी या मुद्द्यांवरही चर्चा करणार आहे.

Sun, 25 Jun 202308:36 AM IST

Mumbai : आदित्य ठाकरे यांची शिवसेनाभवन दादर येथे पत्रकार परिषद

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनाभवन दादर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद आज ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

Sun, 25 Jun 202306:41 AM IST

Apple Credit card : अॅप्पल कंपनी आणणार क्रेडिट कार्ड,आरबीआयसोबत चर्चा सुरु 

आयफोन उत्पादक अॅप्पल कंपनी भारतात पेमेंट सेक्टरमध्ये एन्ट्री करणार आहे. लवकरच कंपनी आपले क्रेडिट कार्ड जारी करु शकते. या कार्डाला अॅप्पल कार्ड असे नाव दिले जाऊ शकते. यासंदर्भातील निगडित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅप्पल कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी आपल्या एप्रिलमध्ये झालेल्या भारत दौऱ्यात एचडीएफसी बँकेचे सीएमडी शशिधर जगदीशन यांच्याशी चर्चा केली होती. त्याशिवाय त्यांनी नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन आॅफ इंडिया (एनपीसीआय) सोबतही चर्चा केली होती.

Sun, 25 Jun 202305:28 AM IST

Manipur Violence : मणिपूरमध्ये महिलांच्या जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला; १२ अतिरेक्यांना सोडण्यास पाडले भाग

Manipur Violence : मणीपुर येथील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. महिला आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे हजार ते दीड हजार महिलांच्या जमावाने सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला करत १२ अतिरेक्यांना सोडवले.

Sun, 25 Jun 202304:06 AM IST

West Bengal Train Accident: पश्चिम बंगालच्या बांकुरात दोन मालगाड्यांची भीषण धडक; इंजिनसोबत मालगाडीचे १२ डबे घसरले

West Bengal Train Accident: पश्चिम बंगालमधील बांकुरामधील ओंडामध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. दोन मालगाड्यांची धडक झाल्याने इंजिनसोबत मालगाडीचे १२ डबे रुळावरून घसरले. या घटनेत मालगाडीचा मोटरमन गंभीर जखमी झाला आहे.

Sun, 25 Jun 202302:48 AM IST

PM Modi US visit :  मोदींच्या अमेरिका दौऱ्यातून भारतात येणार कोट्यवधींची गुंतवणूक 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा भारतासाठी फार फायदेशीर ठरल्याचं मानलं जात आहे. येत्या काळात भारतात अब्जावधी डॉलर्सचा फायदा होणार आहे. गुगल आणि ॲमेझॉनसारख्या अनेक दिग्गज कंपन्यांनी आगामी काळात भारतात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.  यामुळे भारत-अमेरिका संबंध मजबूत झाले असून यामुळे भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक येणार आहे. गुगल कंपनीने भारतात १००० कोटींची, अॅमेझाॅनने २६०० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. एलाॅन मस्कनेही भारतात गुंतवणूकीबाबत रस दाखवला आहे. 

Sun, 25 Jun 202302:09 AM IST

Axis Bank :  ग्राहकांच्या सोईसाठी अ‍ॅक्सिस बँकेचे ‘वन व्ह्यू’ फिचर दाखल

अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या अ‍ॅक्सिस मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर ‘वन व्ह्यू’ हे खास फीचर लाँच केल्याची घोषणा केली. अकाउंट अ‍ॅग्रीगेटर सिस्टीमचा वापर करून अशाप्रकारचे अत्याधुनिक बँकिंग फीचर लाँच करणारी पहिली अ‍ॅक्सिस ही खासगी बँक ठरली आहे. यामुळे ग्राहकांना सफाईदार बँकिंग सेवेचा अनुभव घेता येणार आहे. या फीचरमुळे ग्राहकांना आपल्या पैशांचे व्यवस्थापन करणे सोपे होईल तसेच त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी बँक खाती वापरता येतील. या फीचरच्या मदतीने ग्राहकांना खात्यातील शिल्लक तसेच खर्च तत्काळ जाणून घेता येईल.

Sun, 25 Jun 202302:06 AM IST

EPFO : अधिक पेन्शन वाढीसंदर्भात अर्ज करण्याची अंतिम मुदत उद्या 

ज्या ईपीएफओ सदस्यांनी अधिक पेन्शनसाठी अप्लाय केलं नसेल तर २६ जून २०२३ ही अंतिम मुदत आहे. यापूर्वी २ वेळा अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम मुदतीची ही तारीख पुढे वाढण्याची शक्यता नाही.

Sun, 25 Jun 202301:58 AM IST

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांच्या इजिप्त दौऱ्याचा आज दुसरा दिवस

पंतप्रधान मोदी यांच्या इजिप्त दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज भारत-इजिप्त दरम्यान काही सामंजस्य करार होणार आहेत. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तमधील काही ठिकाणी भेट देणार आहेत.

Sun, 25 Jun 202301:58 AM IST

Ashadhi wari : संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी माळशिरसहून पहाटे प्रस्थान ठेवणार

 संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी माळशिरसहून पहाटे प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर खुडूस फाटा येथे सकाळी दुसरे गोल रिंगण पार पडणार आहे. रिंगण सोहळा संपन्न झाल्यावर माउलींची पालखी वेळापूरच्या दिशेने पस्थान ठेवणार असून पालखीचा वेळापूर येथे मुक्काम असणार आहे.

Sun, 25 Jun 202301:57 AM IST

Ashadhi wari : माळीनगर येथे सकाळी पहिले उभे रिंगण पार पडणार

संत तुकाराम महाराज यांची पालखी अकलूजवरून निघाल्यावर माळीनगर येथे सकाळी पहिले उभे रिंगण पार पडणार आहे. उभे रिंगण संपन्न झाल्यावर पालखी बोरगावच्या दिशेने प्रस्थान ठेवणार असून बोरगाव येथे तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.

Sun, 25 Jun 202301:56 AM IST

sangli : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा सांगलीत सत्कार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा सांगलीत आज भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन करणार आहे. सांगतील काँग्रेस पक्षाने कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर नागरी सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

Sun, 25 Jun 202301:07 AM IST

Manhole Death in Gowandi : खळबळजनक ! मुंबईत मॅनहोलमध्ये सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमुरून मृत्यू

Manhole Death in Gowandi : मुंबईत गोवंडीमध्ये मॅनहोलची सफाई करण्यासाठी त्यात उतरलेल्या दोन सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Sun, 25 Jun 202312:41 AM IST

Wagner Rebellion: मॉस्कोमधील परिस्थिती चिघळली, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी, दहशतवाद विरोधी कायदा लागू

Wagner Rebellion: वॅगनर ग्रुपनं बंड केल्यानंतर मॉस्कोमधील परिस्थिती चिघळली आहे. अशात मॉस्कोमध्ये दहशतवादी विरोधी कायदा लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय सोमवार नॉन वर्किंग दिवस असेल, असे मॉस्कोच्या महापौर सर्गेई सोबयानिन यांनी सांगितलेय.