Live News Updates 14 August 2023: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाला करणार संबोधित
Independence day : राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करतील. सायंकाळी सात वाजता त्या देशाला संबोधतील.
Mon, 14 Aug 202302:36 PM IST
१२ डब्यांच्या 'या' ४९ लोकल ट्रेन उद्यापासून १५ डब्यांसह धावणार
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने उद्यापासून म्हणजे १५ ऑगस्ट २०२३ पासून १२ डब्यांच्या ४९ लोकल ट्रेनचे रुपांतर १५ डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यानचा प्रवास आरामशीर होणार आहे. १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या केल्यानंतर २५ टक्क्यांनी प्रवाशांची क्षमता वाढणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.
Mon, 14 Aug 202310:50 AM IST
वीजचोरी करणाऱ्या दोघांवर गुन्हा
थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या जागेवर चोरून वीज वापरणाऱ्या दोघांवर सिडको पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.सहायक अभियंता मालुसरे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 व 138 अन्वये सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mon, 14 Aug 202309:31 AM IST
Honda Bajaj Finserv : होंडा कार्स- बजाज समूहामध्ये करार,कर्जप्रक्रिया होणार सुलभ
होंडा कार्स इंडिया लिमिटेड (HCIL), या भारतातील आघाडीच्या प्रिमियम कार्स उत्पादक कंपनीने भारतातील एक अग्रगण्य वित्तीय सेवा समूह बजाज फिनसर्व्ह लिमिटेडच्या कर्ज देणाऱ्या बजाज फायनान्स लिमिटेड या शाखे सोबत, आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक आणि परवडणारी वित्त समाधाने ऑफर करण्यासाठी भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे होंडा ग्राहकांना कमी व्याजदरासह आकर्षक कार फायनान्स योजनांचा लाभ घेता येईल आणि होंडा अमेझ, होंडा सिटी लवकरच लाँच होणाऱ्या नवीन एसयूव्ही होंडा एलिव्हेट च्या खरेदीवर झटपट कर्ज मंजूरी मिळू शकेल.
Mon, 14 Aug 202304:42 AM IST
Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस, तर उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट
देशभरात सक्रिय पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, आज आणि उद्या राजधानी दिल्लीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे.
Mon, 14 Aug 202304:08 AM IST
Opening bell : सलग चौथ्या सत्रात घसरण, आज अदानी स्टाॅक्स चर्चेत
सलग तीन आठवड्यातील शेअर बाजाराची घसरण आजही कायम आहे. आज सेंन्सेक्समध्ये २२७ अंशांच्या घसरणीसह तो ६५,०४४.८५ अंश पातळीवर खुला झाला. तर निफ्टी ११४ अंशांच्या घसरणीसह १९३१४.१५ अंशांवर खुला झाला आहे. अदानी समूहावर हिडेनबर्गच्या आरोपासंदर्भात सेबीने अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आज अदानी समूहाचे शेअर्स चर्चेत असणार आहेत
Mon, 14 Aug 202302:21 AM IST
Pune : भाजपकडून फाळणीचा निषेध म्हणून मोर्चा
भाजपकडून फाळणीचा निषेध म्हणून कसबा मतदारसंघातील हेमंत रासने यांच्याकडून निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
Mon, 14 Aug 202302:20 AM IST
Nagpur : नागपुरातील सक्करदरा चौकावर शालेय विद्यार्थ्यांचे सामूहिक वंदेमातरम गीत गायन
नागपूर - अखंड भारत दिनाच्या निमित्ताने राष्ट्र निर्माण समितीद्वारे आज नागपुरातील सक्करदरा चौकावर शालेय विद्यार्थ्यांचा सामूहिक वंदेमातरम गीत गायन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी तसेच लडाखचे खासदार हे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
Mon, 14 Aug 202302:19 AM IST
RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अखंड भारत संकल्पना दिन
अखंड भारत ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकीकरण होणे अपेक्षित आहे. प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रीकरण कमी वेळा झाले.अखंड भारत या संकल्पनेत, सद्य भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, ब्रम्हदेश, अफगाणिस्तान, भूतान, तिबेट, श्रीलंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रीकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून संघात साजरा केला जातो.
Mon, 14 Aug 202312:54 AM IST
India chaina : भारत-चीनमध्ये कमांडर पातळीवर बैठक
भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावर आज १९ वी कमांडर स्तरिय बैठक असेल. वाद असलेल्या सीमेच्या ठिकाणावरुन सैनिकांना त्वरित मागे हटवा यावर भारताचा जोर असेल.
Mon, 14 Aug 202312:53 AM IST
MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक होणार आहे. राज ठाकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे.
Mon, 14 Aug 202312:53 AM IST
Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवार बारामतीमध्ये दाखल
बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बारामती मुक्कामी आहेत. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर दीड महिन्यांच्या कालावधीनंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत आले आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपचे काही नेते आणि माजी आमदार राष्ट्रवादीत सकाळी प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Mon, 14 Aug 202312:53 AM IST
Mumbai Mhada : म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी आज सोडत
मुंबई- म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीसाठी आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहेत.
Mon, 14 Aug 202312:48 AM IST
Independence day : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाला करणार संबोधित
Independence day : राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करतील. सायंकाळी सात वाजता त्या देशाला संबोधतील.