Live News Updates 11 August 2023: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 11 August 2023: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
Live News Updates
Live News Updates (HT)

Live News Updates 11 August 2023: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

Ninad Vijayrao Deshmukh 10:42 AM ISTAug 11, 2023 04:12 PM
  • twitter
  • Share on Facebook

parliament session last day: संसदेच्या अधिवेशानाचा आज शेवटचा दिवस असून अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Fri, 11 Aug 202310:42 AM IST

Closing bell : शेवटच्या सत्रात दिसला विक्रीचा दबाव,सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद 

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारात आणि सलग दुसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्समधील विक्रीमुळे ही घसरण बाजारात दिसून आली आहे. आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स ३६५ अंकांनी घसरला आणि ६५,३२२ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११५ अंकांच्या घसरणीसह १९,४२८ अंकांवर बंद झाला.

Fri, 11 Aug 202305:42 AM IST

Plucck :  प्लकच्या ब्रँड अँम्बेसिडरपदी करीना कपूर 

प्लक या भारतातील एक जीवनशैलीभिमुख, ताज्या फळांच्या आणि भाज्यांच्या आघाडीच्या ब्रॅंडने प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खानशी भागीदारी केल्याचे जाहीर केले आहे. या कंपनीत गुंतवणूक करून एक गुंतवणूकदार आणि ब्रॅंड अम्बॅसडर म्हणून करीना कपूर खानने देखील एफ अँड व्ही उद्योगात आपले स्थान बळकट केले आहे.

Fri, 11 Aug 202303:09 AM IST

mumbai: शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले.

Fri, 11 Aug 202302:44 AM IST

Pune : पुण्यातील दहशतवाद्यांना कोर्टात हजर करणार

पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची पोलीस कोठड संपत असल्याने शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान या चौकशीमध्ये आणखी कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Fri, 11 Aug 202302:44 AM IST

mumbai highcourt: स्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सबाबत मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सबाबत मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील 6 महापालिका आयुक्तांना कोर्टानं समन्स बजावलं असून आज सर्वांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Fri, 11 Aug 202302:44 AM IST

Delhi: न्यायाधीशांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालय आदेश देणार

देशभरातील न्यायाधीशांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय आदेश देणार आहे.   मध्ये झारखंडमधील धनबाद येथील जिल्हा न्यायाधीशांच्या मॉर्निंग वॉक दरम्यान ऑटोरिक्षाच्या धडकेने झालेल्या संशयास्पद मृत्यूची दखल घेत सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी करण्यात आली आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.

Fri, 11 Aug 202302:00 AM IST

delhi: केंद्र सरकारकडून तिरंगा यात्रेचं आयोजन

केंद्र सरकारकडून आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सर्व खासदार आणि मंत्री सहभागी होणार आहेत. दिल्लीतील प्रगती मैदान ते कर्तव्य पथापर्यंत मोटारसायकलवरुन ही तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.

Fri, 11 Aug 202301:59 AM IST

India : इंडिया आघाडीची बैठक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडणार आहे. लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Fri, 11 Aug 202301:21 AM IST

parliament session last day: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

parliament session last day: संसदेच्या अधिवेशानाचा आज शेवटचा दिवस असून अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सबाबत मुंबई उच्च न्यायालायत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.