Live News Updates 10 August 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत दाखल
PM Modi: विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर बोलण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत दाखल झाले आहेत.
Thu, 10 Aug 202311:34 AM IST
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत दाखल
M Modi: विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर बोलण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत दाखल झाले आहेत.
Thu, 10 Aug 202306:47 AM IST
Pakisthan news : पाकिस्तानमध्ये पॉलिटिकल ड्रामा ! मध्यरात्री संसद बरखास्त, इम्रान खानशिवाय होणार निवडणुका
parliament of pakisthan dissolved at midnight : पाकिस्तानमध्ये मध्यरात्री हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. येथील संसद मध्यरात्री बरखास्त करण्यात आली. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी ही कार्यवाही केली आहे.
Thu, 10 Aug 202304:31 AM IST
sambhaji nagar crime : संभाजीनगर हादरले! उधारीची पैसे मागितल्याने तरुणाची गोळ्या घालून हत्या
sambhaji nagar firing News : संभाजी नगर गोलिबाराच्या घटनेने हादरले. उधारीचे साडेसात हजार रुपये मागितल्याने एका अट्टल गुन्हेगाराने तरुणाला भर रस्त्यात गोळ्या घालून ठार मारले.
Thu, 10 Aug 202302:00 AM IST
Nagpur : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार विदर्भ दौऱ्यावर
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज गोंदिया आणि भंडारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची आज बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता विजय वड्डेटीवार पत्रकार परिषद घेतील.
Thu, 10 Aug 202302:00 AM IST
AAP : आपच्या खासदारांची सकाळी पत्रकार परिषद
आपचे नेते राघव चड्ढा यांना विशेषाधिकार समितीची नोटीस आली आहे, या प्रकरणी आपचे सर्व खासदार आक्रमक झालेत. आज सकाळी आपचे खासदार पत्रकार परिषद घेणार आहेत.
Thu, 10 Aug 202302:00 AM IST
Raj Thackeray : महिला अत्याचारांबाबत ठाकरे गट घेणार राज्यपालांची भेट
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत ठाकरे गट राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत. दुपारी ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत.
Thu, 10 Aug 202301:59 AM IST
mumbai : राष्ट्रवादीची (अजित पवार गट) बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गटाची) आज दुपारी ३ वाजता प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. बैठकीला अजित पवार यांच्यासह पक्षातील सर्व मंत्री आणि प्रमुख आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Thu, 10 Aug 202301:58 AM IST
Delhi: अविश्वास प्रस्तावावर चर्चेचा आज तिसरा दिवस
मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधककांडून केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. अविश्वास प्रस्तावावर चर्चेचा आज तिसरा दिवस आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर विरोधकांच्या आरोपांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देणार आहेत.
Thu, 10 Aug 202301:02 AM IST
RBI: आरबीआयकडून पतधोरण जाहीर होणार, लोकसभेत अविश्वास ठरावावर चर्चा
RBI: आरबीआयकडून आज सकाळी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून पतधोरण जाहीर केले जाणार आहे. डाळी, टोमॅटो, कांदा, मसाले आणि भाजीपाल्याचे दर वाढल्याने मागील महिन्यात महागाईत वाढ झाली होती. अशात महागाई संदर्भात सविस्तर माहिती शक्तिकांत दास यांच्याकडून सादर केली जाणार आहे. अमेरिकी फेडररकडून व्याजदर वाढीचे संकेत मिळत असल्यानं आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.