मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Army : भारतीय लष्कराच्या धाडसाला सलाम! मृत्यूच्या जबड्यातून ५०० नागरिकांना काढले बाहेर, पाहा Viral Video

Indian Army : भारतीय लष्कराच्या धाडसाला सलाम! मृत्यूच्या जबड्यातून ५०० नागरिकांना काढले बाहेर, पाहा Viral Video

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 22, 2024 11:58 AM IST

Indian Army Video : भारतीय लष्कराने सिक्कीममधील भारत-चीन सीमेवरील नाथुला येथे बर्फवृष्टीत येथे अडकलेल्या ५०० हून अधिक पर्यटकांची बुधवारी सुटका केली.

Indian Army saved 500 people from china border
Indian Army saved 500 people from china border

Indian Army saved 500 people from china border : भारतीय लष्कराच्या धाडसाची प्रचिती अनेक वेळा आली आहे. शत्रूंपासून देशांच्या सीमांचे रक्षण करणे असो किंवा देशवासीयांना संकटातून सोडवणे अशा प्रत्येक कार्यात भारतीय लष्कर हे नेहमीच पुढे असते. अशीच एक घटना बुधवारी घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. भरती चीन सीमेवर नथूला पास जवळ बर्फवृष्टीत अडलेल्या तब्बल ५०० पर्यटकांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

Pune Drugs racket: पुण्यात तयार झालेल्या ड्रग्सची दिल्लीमार्गे थेट लंडनला तस्करी; तपासात उघड

सिक्कीममधील भारत-चीन सीमेवरील नाथुला पास येथे बर्फवृष्टीमुळे येथे अडकलेल्या ५०० हून अधिक पर्यटकांची बुधवारी सुटका करण्यात आली. लष्कराने अधिकृत निवेदनात ही माहिती दिली. निवेदनानुसार, पूर्व सिक्कीममध्ये अचानक झालेल्या बर्फवृष्टीत ५०० हून अधिक पर्यटक अडकून पडले होते. या घटनेची माहिती लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत, त्याची सुटका केली.

त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांना तेथे बचावासाठी पाठवण्यात आले. त्यांनी अडकलेल्या पर्यटकांना मदत करत त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. सैनिकांनी पर्यटकांना गरम अन्न आणि त्वरित वैद्यकीय मदत देखील दिली. त्यांना भारतीय लष्कराच्या वाहनातून सुरक्षित स्थळी आणण्यात आले. या बचाव मोहिमेचे त्रिशक्ती कौरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले असून हे व्हायरल झाले आहेत.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, अचानक जोरदार बर्फवृष्टीमुळे नाथुला पास येथे ५०० हून अधिक पर्यटकांना घेऊन जाणारी सुमारे १७५ वाहने अडकून पडले. या ठिकाणी उणे शून्य तापमान होते. जर या पर्यटकांना वेळेवर मदत मिळाली नसती तर त्यांच्या जिवावर बेतले असते. मात्र, 'त्रिशक्ती कॉर्प्सचे जवान शून्य तापमानात घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली. त्यांना तत्काळ औषध, गरम अन्न आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली. हिमालयातील देशाच्या सीमेचे रक्षण करणारी त्रिशक्ती कॉर्प्स पर्यटक आणि सामान्य जनतेला सहकार्य करण्यासाठी नेहमीच सक्रिय असते, असेही यावेळी सांगण्यात आले.

IPL_Entry_Point

विभाग