BPSC Recruitment 2024: सहाय्यक प्राध्यापकांच्या १३३९ जागांसाठी भरती, जाणून घ्या A टू Z माहिती
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BPSC Recruitment 2024: सहाय्यक प्राध्यापकांच्या १३३९ जागांसाठी भरती, जाणून घ्या A टू Z माहिती

BPSC Recruitment 2024: सहाय्यक प्राध्यापकांच्या १३३९ जागांसाठी भरती, जाणून घ्या A टू Z माहिती

Jun 21, 2024 07:41 PM IST

BPSC Job: बीपीएससी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापकांच्या १ हजार ३३९ पदांच्या भरती सुरू आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

बीपीएससी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापकांच्या १ हजार ३३९ पदांच्या भरती सुरू
बीपीएससी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापकांच्या १ हजार ३३९ पदांच्या भरती सुरू

Government Job 2024: बिहार लोकसेवा आयोग बिहार सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय रुग्णालये आणि विद्यापीठे/ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक (वैद्यकीय) पदांच्या १ हजार ३३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावर bpsc.bih.nic.in येथे पाठवावे. अर्ज करण्यासाठी, अर्जदारांना लॉगिन पृष्ठावर त्यांचे नोंदणीकृत नाव आणि पासवर्डसह साइन इन करणे आवश्यक आहे. बीपीएससीनुसार, उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि इतर निकषांचे तपशीलवार मूल्यमापन करून केली जाईल.

पगार:

नोकरीचे ठिकाण बिहारमध्ये असेल तर पगार १५ हजार ६०० ते  ३९ हजार १०० दरम्यान असेल.  यात (लेवल-११) ६ हजार ६०० रुपये ग्रेड पेचा समावेश आहे.

वयोमर्यादा:

१ ऑगस्ट २०२४ रोजी प्रवर्गनिहाय कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे:

  • अनारक्षित प्रवर्ग: ४५ वर्षे
  • मागासप्रवर्ग / अतिमागास प्रवर्ग (पुरुष आणि महिला): ४८ वर्षे
  • अनारक्षित महिला, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (पुरुष आणि महिला): ५० वर्षे
  • बिहार राज्य आरोग्य सेवा संवर्गात कार्यरत डॉक्टर: ५० वर्षे

Police Bharti 2024: पोलीस भरतीसाठी स्पर्धा फार! पुण्यातील १ हजार २१९ पदांसाठी तब्बल पावणेदोन लाख अर्ज

शैक्षणिक पात्रता :

एमबीबीएस परीक्षेचे गुण:

७० टक्क्यांपेक्षा अधिक : ५ गुण

६५ टक्क्यांपेक्षा जास्त : ४ गुण

६० टक्क्यांपेक्षा जास्त : ३ गुण

५५ टक्क्यांपेक्षा जास्त : २ गुण

५० टक्क्यांपेक्षा जास्त : १ गुण

महत्त्वाचे म्हणजे, एखादा उमेदवार एमबीबीएस परीक्षेत अनुत्तीर्ण झाला असेल तर संबंधित विषयातील अनुत्तीर्ण आणि उत्तीर्ण गुणांची सरासरी घेऊन परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांची गणना केली जाईल, बीपीएससीने म्हटले आहे.

 

पदव्युत्तर अर्जांसाठी मूल्यमापन:

  • मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून मान्यताप्राप्त एमडी / एमएस किंवा समकक्ष पात्रता:
  • त्याच स्पेशालिटीमध्ये १० गुण पीएचडी, डीएम, M.CH आणि डी.एन.बी.(सुपरस्पेशालिटी): 10 गुण
  • सरकारी क्षेत्रातील कार्यानुभव: २ गुण प्रति पूर्ण वर्ष आणि जास्तीत जास्त १० गुणांपर्यंत

या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बीपीएससीच्या अधिक वेबसाईटवर भेट द्यावी.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर