मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक..! १६ वर्षाच्या मुलाकडून शेजारच्या ९ वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या, मृतदेह घरातच जाळण्याचा प्रयत्न

धक्कादायक..! १६ वर्षाच्या मुलाकडून शेजारच्या ९ वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या, मृतदेह घरातच जाळण्याचा प्रयत्न

Jul 01, 2024 11:24 PM IST

Crime News : पोलिसांनी सांगितले की, आरोपी सकाळी १० च्या सुमारास पीडितेची आई आणि भाऊ शेजाऱ्याच्या अपार्टमेंटमध्ये गेले असताना तिला गृहपाठ करण्यास मदत करण्यासाठी तिच्या घरी गेला व तिची हत्या केली.

अल्पवयीन मुलाकडून ९ वर्षीय बालिकेची हत्या (Representative image)
अल्पवयीन मुलाकडून ९ वर्षीय बालिकेची हत्या (Representative image)

१६ वर्षाच्या मुलाने शेजारी राहणाऱ्या ९ वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुग्राममधील द्वारका एक्स्प्रेस वेवरील सेक्टर १०७ मध्ये घडली. याप्रकरणी १६ वर्षीय आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीची आई आणि भाऊ शेजाऱ्याच्या अपार्टमेंटमध्ये गेले होते. हे पाहून आरोपी मुलगा सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुलीला होमवर्क करण्यात मदत करण्याच्या  निमित्ताने तिच्या घरी गेला. पोलिस उपायुक्त (पश्चिम) करण गोयल यांनी सांगितले की, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरी करताना पकडल्यानंतर त्याने मुलीचा खून केल्याचे त्याने सांगितले.

चोरी करून फ्लॅटमधून पळून जाताना मुलीने पाहिले होती. मुलगी चोरीची गोष्ट घरच्या लोकांना सांगेल, या भीतीपोटी त्याने कपड्याच्या सहाय्याने  मुलीचा गळा दाबला व तिची  हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावून घटनास्थळावरून पळून जाण्याआधीच मुलीची आई घरी आली. समोरचे दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. 

ट्रेंडिंग न्यूज

डीसीपी गोयल म्हणाले की, सकाळी १०.४५ च्या सुमारास पोलिसांना नियंत्रण कक्षात फोन आला आणि धनकोट आणि राजेंद्र पार्क पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.

मृत मुलीची आईने शेजाऱ्यांच्या मदतीने अल्पवयीन आरोपीला पकडून ठेवले होते. आईने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती आपल्या मुलासह शेजाऱ्याच्या अपार्टमेंटमधून घरी परतली तेव्हा लोखंडी ग्रीलचा दरवाजा बंद होता आणि लाकडी दरवाजा उघडा होता.

त्याच सोसायटीत राहणारा एक मुलगा त्यांना घरात दिसला.  हा मुलगा अनेकदा त्यांच्या घरी येत असे. मुलाने दरवाजा उघडला नाही आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी दरवाजा तोडून अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. खोलीतून आग निघताना आईला दिसली आणि शेजाऱ्यांच्या मदतीने ती बेडरूममध्ये शिरली. मुलगी मृतावस्थेत पडल्याचे दिसले. तसेच मुलगा तिचा मृतदेह जाळत असल्याचे पाहून सर्वांना धक्का बसला. मुलीच्या अंगावरील कपडे पेटवले होते. 

याप्रकरणी राजेंद्र पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. आरोपीला  किशोर न्याय मंडळासमोर (जेजेबी) हजर केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

WhatsApp channel
विभाग