Viral Video : मध्य प्रदेशातील अशोकनगरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक २४ वर्षांचा तरुण छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेला होता. यावेळी तो डॉक्टरांच्या घरासमोरच्या बाकावर बसून वाट पाहत होता. यावेळी अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो बेंचवरून खाली पडला. व त्याच्या मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शाहरुख मिर्झा असे हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
समोर आलेल्या व व्हायरल झालेला हा व्हिडिओ १८ सेकंदाचा आहे. या व्हिडीओमध्ये तरुण बेंचवर बसून डॉक्टरची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. अचानक तो त्याचे दोन्ही हात पायावर ठेवतो. दरम्यान, काही सेकंदात तो जवळच ठेवलेल्या दुसऱ्या बाकावर कोसळून पडतो. खाली पडल्याने त्याचे डोके बेंचवर जोरात आदळतांना दिसत आहे. तो पडल्याचे पाहून आजूबाजूचे लोक त्याला उचलण्यासाठी धावले. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृताला मिरगीचा त्रास होता असे सांगण्यात येत आहे. मंगळवारी यावर उपचार घेण्यासाठी ते सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टर डॉ. पंकज गुप्ता यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले होते.
तरुणाच्या मृत्यूबाबत डॉक्टर पंकज यांनी सांगितले की, संबंधित तरुण हा आमच्याकडे उपचारासाठी आला होता. सुमारे दोन मिनिटे तो बाकावर बसला आणि नंतर खाली पडला. आम्ही त्याला चंदेरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. जिथे त्याचा ईसीजी करण्यात आला. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. त्यांना रात्री बराच वेळ छातीत दुखत होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला शाहरुख मिर्झा यांचे दुचाकी दुरुस्तीचे दुकान होते. दुकानात असतांना त्याच्या छातीत दुखू लागले. यानंतर तो त्याच्या घरी गेला. सोमवारपर्यंत प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तो स्वत: डॉ.पंकज गुप्ता यांच्याकडे उपचारासाठी गेला. हा तरुण घरातला एकमेव कमावता होता. त्याच्या लहान भावाची मानसिक स्थिती चांगली नाही. वडील देखील वारले आहे. त्याला एक तरुण मुलगी आहे तर त्याची पत्नी गरोदर आहे. आता त्याच्या कुटुंबात त्याची आई, लहान भाऊ, पत्नी आणि मुलगी आहे.