Viral Video: गर्दीच्या ठिकाणी चोरांपासून, खिसेकापूंपासून सावध रहा अशा सुचना वारंवार दिल्या जातात. मात्र, एका चोरट्याने चक्क तरुणीच्यासमोरच तिचा मोबाईल चोरी केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील चोरट्याची चोरीची आयडिया पाहून नेटकरी शॉक झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रिक्षामधून जाताना दिसत आहे. इतक्यात ती चाललेल्या रिक्षाशेजारी काही तरुण दुचाकीवरून येतात. दुचाकीवरील एक जण तरुणीशी बोलायला सुरुवात करतो. त्यानंतर बोलता बोलता तिच्याकडे मोबाईल नंबर मिळेल का? अशी विचारणा करतो. यावर मुलगी हो बोलते. नंबर देण्यासाठी मुलगा तिचाच मोबाईल मागतो आणि त्यावर टाईप करुन देईल, असे सांगतो. मग तरुणी तिचा मोबाईल त्याला देते.
तरुणीचा मोबाईल हातात येताच बाईकच्या मागे बसलेला तरुण दुचाकी पळवं असे म्हणतो. तरुणीचा काही समजायच्या आत दोघेही तिचा मोबाईल घेऊन पसार झाला. पाठीमागून मुलगी आवाज देते, पण तोपर्यंत गाडीवरील तरुण दिसेनासे होतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.