Bhubaneswar Crime : भुवनेश्वर येथील खंदगिरी येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. एका रोडरोमिओने एका मुलीवर एकतर्फी प्रेम करत तिला त्रास देत होता. याला मुलीच्या काकाने विरोध केला असता, काकावर धारधार शस्त्राने डोक कापून शिरच्छेद केला. खून झालेला व्यक्ति हा दुचाकीवरून घरी परत येत असतांना आरोपीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपी हा अल्पवयीन असून त्याला अटक करण्यात आली आहे.
खंडगिरी पोलिसांच्या हद्दीतील जगन्नाथ नगरजवळील सुका विहार परिसरात ही घटना घडली अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. जगा मल्लिक असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे मल्लीकच्या पुतणीवर एकतर्फी प्रेम होते. यामुळे तो मुलीला त्रास देत होता. आरोपी त्रास देत असल्याचं मुलीने मल्लीकला सांगितलं होतं. यामुळे मल्लीकने आरोपीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा त्रास दिल्यास बरे वाईट करण्याची धमकी देखील आरोपीला मल्लीकने दिली होती. मात्र, त्याने मुलीचा नाद सोडण्यास नकार दिला. जो त्याच्या प्रेमाच्या वाटेत येईल त्याला मारण्याचं आरोपीने ठरवलं.
बुधवारी रात्री उशिरा १२ वाजण्याच्या सुमारास पूर्वनियोजित पद्धतीने आरोपी तलवार घेऊन निर्जन ठिकाणी जगाची वाट पाहत होता. जगा मल्लीक दुचाकीवरून घरी परतत असताना आरोपीने अचानक जगा मल्लीकवर तलवारीने वर करत त्याचं डोक कापलं. यानंतर आरोपी फरार झाला. तर जगा मलिकचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खंडेगिरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कॅपिटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी पथकांची स्थपणा केली. तसेच आरोपीचा कसून शोध घेतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा खरोखरच अल्पवयीन आहे की नाही, याची चौकशी सुरू आहे. आम्ही त्याची शैक्षणिक पात्रता तपासत असून त्याचे वय किती आहे याचा देखील तपास सुरू आहे, अशी माहिती खंडगिरी पोलिसांनी दिली.