मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नक्षल्यांशी संबंध असल्याच्या आरोपांतून प्रा. साईबाबांची मुक्तता, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

नक्षल्यांशी संबंध असल्याच्या आरोपांतून प्रा. साईबाबांची मुक्तता, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 14, 2022 01:49 PM IST

Professor Saibaba : नक्षल्यांशी संबंध असल्याच्या आरोपांतून दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक साईबाबा यांची मुंबई हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे.

delhi university professor saibaba
delhi university professor saibaba (HT)

delhi university professor saibaba : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांची नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधाच्या आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. २०१४ साली नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांखाली दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१७ साली गडचिरोली न्यायालयानं नक्षलवादी चळवळींना पाठिंबा देत देशविरोधी कारवायांत सहभाग असल्याचा ठपका ठेवत जीएन साईबाबा यांच्यासह पाच अन्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

प्राध्यापक साईबाबा हे सध्या नागपूरमधील तुरुंगात आहेत. ते ९० टक्के अपंग असल्यानं नेहमीच ते व्हिलचेयरवर असतात. गडचिरोली न्यायालयानं सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात साईबाबा यांनी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायमूर्ती रोहित देव आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यानंतर दोन्ही न्यायमूर्तींनी गडचिरोली न्यायालयानं प्राध्यापक साईबाबांसह पाच जणांना सुनावलेली शिक्षा रद्द करत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

तब्बल आठ वर्षांनंतर मिळाला न्याय...

साईबाबा यांना २०१४ साली अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. २०१७ साली त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु गेल्या आठ वर्षांपासून ते तुरुंगात होते. त्यामुळं आता प्राध्यापक जीएन साईबाबा यांच्यासह अन्य पाच जणांची हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point