मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Crime: समुद्रकिनाऱ्यावर तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने खळबळ!

Crime: समुद्रकिनाऱ्यावर तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने खळबळ!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 12, 2023 08:02 PM IST

West Bengal Crime: पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला.

crime news
crime news

West Bengal Murder: पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणाीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह तिथे पडलेला पाहून लोकांनी ताबडतोब पोलिसांना बोलावले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहे. मृतदेहाची अवस्था पाहून या तरुणीसोबत काही अनुचित प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

ट्रेंडिंग न्यूज

मंदारमणि आणि चांदीपूर दरम्यानच्या जलदा भागात स्थानिक लोकांना समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. तिच्या अंगावर फक्त अंतर्वस्त्रे होती. तरुणीला अशा अवस्थेत पाहून लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. या तरुणीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? हे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट होईल.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा मृतदेह समुद्रकिनाऱ्याजवळील दगडावर पडलेला दिसला. या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही. तरुणी या परिसरातील नाही. तरुणीची अज्ञात स्थळी हत्या करण्यात आली आणि नंतर तिचा मृतदेह तिथे आणून टाकला.

WhatsApp channel

विभाग