मराठी बातम्या  /  बिझनेस  /  BMW new bike launch: बीएमडब्ल्यूने भारतात लॉंच केली नवी बाइक; ह्युंदाई क्रेटा कारपेक्षाही महाग

BMW new bike launch: बीएमडब्ल्यूने भारतात लॉंच केली नवी बाइक; ह्युंदाई क्रेटा कारपेक्षाही महाग

Jul 06, 2024 06:21 PM IST

बीएमडब्ल्यू आर 12 आणि आर 12 नाइन टी मध्ये नवीन बॉक्सर ट्विन इंजिन चा वापर करण्यात आला आहे. या मोटारसायकलींची डिलिव्हरी सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होईल.

The motorcycles now use a new boxer engine with a capacity of 1,170 cc.
The motorcycles now use a new boxer engine with a capacity of 1,170 cc.

बीएमडब्ल्यू मोटररॅड इंडिया कपंनीने त्यांच्या नवीन R 12 आणि R nineT या दोन बाइक भारतीय बाजारात लाँच केल्या आहेत. या बाइकची किंमत क्रमशः १९ लाख ९० हजार रुपये आणि २० लाख ९० हजार रुपये एवढी आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. बीएमडब्ल्यू मोटररॅड कंपनी दोन्ही मोटारसायकल पूर्णपणे बिल्ट-अप युनिट्स (सीबीयू) म्हणून बाजारात आणणार असून सप्टेंबर २०२४ पासून ग्राहकांना बाइक्सची डिलिव्हरी सुरू करण्यात येणार आहे.

या दोन्ही मोटारसायकलींच्या बाह्यरचनेत यांत्रिकदृष्ट्या काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या मोटरसायकलमध्ये सिंगल पीस ट्यूबलर ब्रिज स्टील स्पेसफ्रेम आणि अटॅच्ड रियर फ्रेम देण्यात आली आहे. या अद्ययावत फ्रेममुळे बाइक थोडी हलकी आणि सुव्यवस्थित दिसते. याव्यतिरिक्त, नवीन फ्रेममध्ये एअरबॉक्सचा विस्तार करण्यास परवानगी देण्यात आली आहे, जी आता सीटच्या खाली ठेवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या दोन्ही मोटारसायकलींमध्ये पुढील भागात इनव्हर्टेड फोर्क आणि मागील बाजुला मोनोशॉक देण्यात आले आहे. R 12 nineT ही बाइक पूर्णपणे समायोज्य फ्रंट फोर्क सुसज्ज बाइक आहे. बाइकमध्ये मागील बाजूस पॅरालेव्हर स्विंग आर्म आहे. 4-पिस्टन मोनोब्लॉक ब्रेक कॅलिपरसह फ्रंटमध्ये ट्विन 320-डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस सिंगल डिस्क ब्रेकची व्यवस्था आहे. 

BMW R 12 nineT आणि R 12 ची वैशिष्ट्ये

या बाइकमध्ये १,१७० सीसी एअर / ऑईल कूल्ड बॉक्सर इंजिन आहे. हे इंजिन ७,००० आरपीएमवर १०७ बीएचपी पॉवर आणि R 12 मध्ये ६,५०० आरपीएमवर ११५ एनएम पीक टॉर्क आणि ६,५०० आरपीएमवर ९३ बीएचपी आणि ६,००० आरपीएमवर ११० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ट्विन एक्झॉस्ट सिस्टीम आता डाव्या बाजूला बसवण्यात आली आहे.

दोन्ही मोटारसायकलवर स्टँडर्ड म्हणून रेन, रोड आणि डायनॅमिक असे तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त R 12 nineT मध्ये रोल आणि रॉक मोड देखील देण्यात आला आहे. बीएमडब्ल्यू मोटररॅडमध्ये डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल, कीलेस राइड, इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल, नवीन क्लासिक राऊंड इंस्ट्रुमेंट्स तसेच यूएसबी-सी आणि 12 व्ही सॉकेट स्टँडर्ड म्हणून देण्यात आले आहे.

There are a few optional packages that the customers can choose from for the R 12 and R 12 nineT.
There are a few optional packages that the customers can choose from for the R 12 and R 12 nineT.

‘डायनॅमिक राइडिंगचा आनंद घेणाऱ्यांसाठी बीएमडब्ल्यू मोटररॅड कंपनीने R nineT सह क्लासिक बाइक्सचा वेगळा सेगमेंट स्थापित केला आहे. नवीन R 12 सीरिज ही तुम्हाला अस्सल, भावनिक रायडिंगचा अनुभव देते. शहरी वातावरणात ही बीएमडब्ल्यू क्लासिक रोडस्टर म्हणून स्टायलिश छाप पाडते.’ असं बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पाहवा यांनी सांगितले.

WhatsApp channel
विभाग