मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BMM Convention: बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पुढचे अधिवेशन ‘बे एरिया’त रंगणार

BMM Convention: बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पुढचे अधिवेशन ‘बे एरिया’त रंगणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 18, 2022 03:56 PM IST

BMM Convention: बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या यंदाच्या अधिवेशनाची नुकतीच यशस्वी सांगता झाली. २०२४ रोजी होणाऱ्या अधिवेशनाचं स्थळही ठरलं आहे.

Bruhan Maharashtra Mandal
Bruhan Maharashtra Mandal

BMM Convention: करोनामुळं खंड पडलेलं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन यंदा न्यू जर्सी इथं उत्साहात पार पडलं. ढोल ताशांच्या गजरात आणि मराठमोठ्या ढंगात अधिवेशनाची यशस्वी सांगता झाली. यावर्षीच्या उत्सवाची सांगता करतानाच पुढील अधिवेशनाचं स्थळ ठरलं असून २०२४ चं अधिवेशन ‘बे एरिया’त रंगणार आहे. 

न्यूजर्सी इथं रंगलेल्या या अधिवेशनाची सांगता पारंपारिक विज्ञान दिंडीने झाली. नादरंग या ढोलताशांच्या कार्यक्रमात शिकागो, डलास, कनेक्टिकट, न्यू इंग्लंड सिएटल, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी ह्या शहरांमधून आलेल्या ढोलताशांच्या पथकाच्या वादनानं अवघा आसमंत दुमदुमून गेला. यावेळी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी आणि प्रमुख संयोजक प्रशांत कोल्हटकर, सह संयोजक अमर उर्हेकर यांनी हे अधिवेशन यशस्वी करणाऱ्या सगळ्यांचेच आभार मानले.

अधिवेशनातील नृत्यरंग आणि नाट्य रंग स्पर्धेत स्थानिक कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग लाभला. शंकर महादेवन नाईट या सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरलं. तसंच स्वास्थ्य, मानसिक आरोग्य असे महत्त्वपूर्ण विषय अधिवेशनात समाविष्ट होते. लहान मुलांसाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रम, समुद्र पर्यटन आणि दरवर्षीप्रमाणे ज्येष्ठ नागरीकांसाठी उत्तररंग अन् विवाहइच्छुकांठी रेशीमगाठी हे कार्यक्रम तर होतेच. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या पदार्थांचा आस्वाद घेत सगळेच तृप्त झाले. मराठी संस्कृतीचा ध्वज फडकावत ठेवण्याचा निर्धार करत सगळे आपापल्या राज्यात परतले. सातासमुद्रापार मराठी भाषा जपणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळेतील मुलांचा तथास्तु हा कार्यक्रम अत्यंत लक्षवेधी ठरला.

WhatsApp channel

विभाग