सार्वजनिक ठिकाणी कधी-कधी असे काही भयानक दृश्य दिसते की, लोकांची झोप उडते.तसेच असे म्हणू शकता कीस फेमस होण्यासाठी काही लोक सार्वजानिक स्थानावर असे काही स्टंट करतात, ज्यामुळे आस-पासचे लोक थक्क होतात. असेच काही दृष्य दिल्लीच्या रस्त्यांवर पाहायला मिळाले. एका तरुणीने असे काही केले की, भीतीने लोकांची गाळण उडाली व मुलै सैरावैरा धावू लागले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यंदा म्हणजेच २०२४ मध्ये दिवाळी व हॅलोवीन एकाच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी होती. त्यामुळे हॅलोवीन साजरी करणारेही दिवाळीचे पटाखे उडवम्यात व पूजा अर्चा करण्यात व्यस्त होते. मात्र असे कसे होऊ शकते की, हॅलोवीन कोणीच साजरी केली नसेल. हॅलोवीन लुकमध्ये घरातून बाहेर पडलेल्या तरुणीचा व्हिडिओ दिवाळीच्या २ आठवड्यानंतर व्हायरल होत आहे.
प्रेमात असताना प्रियकर प्रेयसीचं एकमेकांना किस करणं स्वाभाविक! उच्च न्यायालयानं रद्द केला लैंगिक छळाचा आरोप
यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये चेहरा व कपड्यांवर लाल रंगाचा पेंट लावून फिरत आहे. हा रंग हुबेहुब रक्तासारखा दिसत आहे. हे पाहून मुले तसेच वृद्धही घाबरले आहेत. व्हायरल व्हिडिओवर यूजर्सकडून अनेक प्रतिक्रिया येत असून आतापर्यंत हा व्हिडिओ ७० लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे.
या क्लिपमध्ये भूत बनलेली महिला सर्वात आधी पार्कच्या दिशेने जाते. तेथे खेळत असलेली मुले तिला पाहून भीतीने पळून जातात. त्यानंतर हडळ बनलेली महिला वॉचमनच्या जवळून जाते, तिला पाहून गार्ड हात जोडतो. त्यानंतर ती एका ज्वेलरी शॉपसमोर थांबते व आतमध्ये पाहते.
त्यानंतर ती आपला रक्तरंजित लुक व विस्टलेले केस घेऊन रहदारी असलेल्या रस्त्यावर येते. तिला पाहून लोक शॉक्ड होतात. तेथील लोक तिचा व्हिडिओ बनवू लागतात, तिचे फोटो काढतात. ५१ सेकंदाच्या या क्लिपमध्ये महिलेचा भयंकार लूक दिसतो.
या व्हिडिओतील महिला एक मेकअप आर्टिस्ट असून आपले काम दाखवण्यासाठी तिने ही रील बनवली आहे. तिचा मेकअप इतका हुबेहुब झाला होता की, पार्कमध्ये खेळणारी मुलेही तिला पाहून पळून गेली होती. रस्त्यावरील लोकही तिला पाहून घाबरले होते. त्यानंतर समजले की, महिला हे रील बनवण्यासाठी करत आहे. तसेच तिच्या टॅलेंटचे कौतुक करत आहेत.