Blinkit Condoms Order News: व्यवसायाच्या जगात नेहमीच काहीतरी मनोरंजक घडत असते. ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने २०२३ णधील ग्राहकांच्या आवडीच्या आणि सर्वाधिक ऑर्डरच्या डिशबद्दल माहिती शेअर केली होती. त्यानुसार, या वर्षात झोमॅटोवरून सर्वाधिक बिर्याणीची ऑर्डर करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर झोमॅटोच्या मालकीची कंपनी ब्लिंकिटने २०२३ मध्ये वेगवेगळ्या शहरातून ऑर्डर केलेल्या वस्तूंची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात एका व्यक्तीने चक्क १० हजार कंडोम ऑर्डर केल्याची कंपनीने माहिती दिली आहे. यासाठी कंपनीने ठिकठिकणी होर्डिंग लावून त्यांच्या ग्राहकांचा गौरव केला आहे.
ब्लिंकिटचे सीईओ आणि सह-संस्थापक अलबिंदर धिंडसा म्हणाले की, यावर्षी विक्रीचे काही मनोरंजक ट्रेंड समोर आले. ही खरेदी पद्धत सामाजिक बदल दर्शवते. दक्षिण दिल्लीतील एका ग्राहकाने क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ब्लिंकिटवरून चक्क ९,९४० कंडोम मागवले. 'ब्लिंकिट ट्रेंड्स 2023' नुसार, गुरुग्राममध्ये या वर्षी चक्क ६५ हजार ९७३ लायटर ऑर्डर करण्यात आले. तसेच दिल्लीत यावर्षी सॉफ्ट ड्रिंक्सपेक्षा जास्त टॉनिक वॉटर ऑर्डर करण्यात आले.
ब्लिंकिटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, एका महिन्यात कोणीतरी चक्क ३८ अंडरवेअर ऑर्डर केल्या. तर, दुसऱ्या ग्राहकाने ९७२ चार्जर मागवले. यावर्षी स्विगीवरून सर्वात जास्त बिर्याणी सर्वात ऑर्डर करण्यात आली. याशिवाय, विविध शहरांमध्ये खरेदी केलेल्या विविध पदार्थांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली.
मध्यरात्रीनंतर ब्लिंकिटवरून सुमारे ३ कोटी २० लाख ०४ हजार ७२५ मॅगीच्या पाकिटांची ऑर्डर करण्यात आली. एका ग्राहकाने एका ऑर्डरमध्ये १०१ लिटर मिनरल वॉटर खरेदी केले होते. यावर्षी सुमारे ८० हजार २६७ गंगा पाण्याच्या बाटल्या ब्लिंकिटद्वारे वितरित करण्यात आल्या. २०२३ मध्ये कोणीतरी ४ हजार ८३२ बाथ साबण खरेदी केले. यावर्षी सुमारे ३ लाख ५१ हजार ३३ प्रिंटआउट्स सकाळी ८ वाजेपूर्वी वितरित करण्यात आले आणि १ कोटी २२ लाख ३८ हजार ७४० आईस्क्रीम आणि ८ लाख ५० हजार ११ आइस क्यूब पॅकेटसह ४५ लाख १६ हजार ४९० एनो पाऊचची ऑर्डर देण्यात आली. हैदराबादमधील एका व्यक्तीने यावर्षी १७ हजार ०९ तांदूळ ऑर्डर केली.