भारतात आता ‘अंधा’ कानून नाही! न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवारीऐवजी संविधान
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतात आता ‘अंधा’ कानून नाही! न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवारीऐवजी संविधान

भारतात आता ‘अंधा’ कानून नाही! न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवारीऐवजी संविधान

Updated Oct 16, 2024 09:32 PM IST

goddessofjustice Statue :न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. आधीप्रमाणेच या मूर्तीच्या हातात तराजू आहे, मात्र दुसऱ्या हातात तलवारीच्या जागी भारताचे संविधान आहे.

न्यायदेवतेची मूर्ती
न्यायदेवतेची मूर्ती

सुप्रीम कोर्टात न्याय देवतेची नवीन मूर्ती लावली गेली आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये लावण्यात आलेल्या नव्या मूर्तीचे वैशिष्ट्ये आहे की, या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. आधीप्रमाणेच या मूर्तीच्या हातात तराजू आहे, मात्र दुसऱ्या हातात तलवारीच्या जागी भारताचे संविधान आहे.

प्रतिकात्मक दृष्टीने पाहिले तर काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेली न्यायदेवतेचा नवीन पूतळा हा न्याय आंधळा नसतो असा स्पष्ट संदेश देत असल्याचं सांगितलं जातंआहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र असे पुतळे कोर्टरुममध्ये तसेच आणखी काही ठिकाणी बसवणार की नाही, हे काही स्पष्ट झालेलं नाही.

न्यायदेवतेच्या नव्या पुतळ्याचे वैशिष्ट्ये काय आहे -

न्यायदेवतेच्या या नव्या पुतळ्याचा रंग पूर्णपणे पांढरा आहे. पुतळ्यामध्ये न्यायदेवतेचे भारतीय पोशाखात चित्रण करण्यात आले आहे. न्यायदेवतने साडी परिधान केल्याचे सांगितले आहे. डोक्यावर मुकुट आहे. कपाळावर टिकली, कानात आणि गळ्यात पारंपरिक दागिनेही दिसतात. न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आहे. दुसऱ्या हातात संविधान धरलेले दाखवले आहे.

खरे तर न्यायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या न्यायालयांमध्ये ठेवलेल्या पुतळ्याला'लेडी जस्टिस'म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी होती. आता ती हटवण्यात आली आहे.

हातात तलवारीऐवजी संविधान -

न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने संदेश दिला आहे की, आता न्यायदेवता डोळस झाली आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड़ यांच्या निर्देशाने न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली आहे. त्याचबरोबर हातात तलवारीच्या जागी संविधानाची प्रत दिसत आहे. मूर्तीच्या हातात तराजूचा अर्थ आहे की, न्यायदेवता फैसला देण्यासाठी प्रकरणातील पुरावे व तथ्यांचे तुला करते. तलवारीचा अर्थ आहे की, न्याय तेज आणि अंतिम असेल.

आतापर्यंत न्यायदेवतेच्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. एका हातात तराजू आणि दूसऱ्या हातात तलवार होती. यामुळे एक म्हण प्रचलित होती की, कायदा आंधळा असतो. न्यायालयात दिसणाऱ्या मूर्तीला लेडी जस्टिस मूर्ती म्हटले जाते. या मूर्तीला मिस्रची देवी मात आणि ग्रीक देवी थेमिस या नावाने ओळखले जाते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर