मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Bjp Won The Amul Milk Dairy Election In Gujarat Today See Details

Amul Dairy Election : गुजरातमधील काँग्रेसचा अभेद्य बुरुज ढासळला; अमूल दूध संघात भाजपची एकहाती सत्ता

BJP vs Congrees In Amul Dairy Election
BJP vs Congrees In Amul Dairy Election (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Feb 18, 2023 06:33 PM IST

BJP vs Congrees In Amul Dairy Election : स्वातंत्र्यानंतर १९४८ साली अमूल दूध संघाची स्थापना झाली होती. तेव्हापासून अमूलवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती.

BJP vs Congrees In Amul Dairy Election : गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असतानाही भाजपनं डिसेंबरमध्ये तब्बल १५६ जागा जिंकत पुन्हा विधानसभेचं मैदान मारलं आहे. विधानसभेनंतर अमूल दूध संघाच्या निवडणुकीत गेल्या ७५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपनं सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळं आता गुजरातमध्ये हा काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपनं अमूल दूध संघाच्या निवडणुकीसाठी व्यूहरचना आखायला सुरुवात केली होती. भाजपच्या विजयानंतर काँग्रेसच्या सत्तेची सद्दी अखेर संपली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गुजरातमध्ये अमूल डेयरी वगळता इतर १८ दूध सहकारी दूध संघावर भाजपची सत्ता आहे. अमूल दूध सहकारी संस्थेवर स्थापनेपासूनच काँग्रेसची एकहाती सत्ता राहिलेली होती. काँग्रेसचे नेते कांती परमार सोढा यांच्यासह पाच नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपनं सत्तेचा सोपान गाठला आहे. अमूल डेयरीचे चेयरमन राहिलेल्या रामसिंह परमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही अमूल दूध संघावर भाजपची सत्ता आली नव्हती. परंतु त्यानंतर अमूलच्या पाच संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे संचालकांची संख्या वाढली होती. त्यानंतर झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे.

काँग्रेसच्या जोवनसिंह चौहान, मानसिंह झाला, सीता परमार, शारदा पटेल आणि घेला झाला या नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश केला होता. त्यानंतर अमूलच्या संचालक मंडळातील काँग्रेसच्या सदस्यांची संख्या कमी झाली आणि भाजपचं संख्याबळ वाढल्यामुळं अमूल दूध संघावर भाजपनं सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळं आता विधानसभेच्या निवडणकीनंतर काँग्रेससाठी गुजरातमधील हा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.