मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राष्ट्रपती भवनात पुतळा नको, द्रौपदी मुर्मूंचा आवाज कधीच ऐकला नाही : तेजस्वी यादव

राष्ट्रपती भवनात पुतळा नको, द्रौपदी मुर्मूंचा आवाज कधीच ऐकला नाही : तेजस्वी यादव

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 17, 2022 12:26 PM IST

एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आहेत. त्यांच्याबाबत बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या कमेंटवरून वाद निर्माण झाला आहे.

द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवरून तेजस्वी यादव यांची केंद्रावर टीका
द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवरून तेजस्वी यादव यांची केंद्रावर टीका (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Tejaswi yadav on draupadi murmu: देशात राष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी उद्या (१८ जुलै) निवडणूक होणार आहे. एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या आहेत. त्यांच्याबाबत बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी केलेल्या कमेंटवरून वाद निर्माण झाला आहे. तेजस्वी यादव यांनी आता माफी मागावी, त्यांची मानसिकता आदिवासी विरोधी असल्याचं भाजपने (BJP) म्हटलं आहे.

आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं की, "राष्ट्रपती भवनात आम्हाला कोणताही पुतळा नको आहे, आम्ही राष्ट्रपती निवडून देत आहे. तुम्ही यशवंत सिन्हा यांचे नाव नेहमीच ऐकले असेल पण सत्ताधाऱ्यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबद्दल आम्ही कधी ऐकलं नाही. जेव्हापासून त्या उमेदवार झाल्या आहेत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही." तेजस्वी यादव यांच्या टीकेनंतर आता भाजपकडून यावर प्रत्युत्तर देण्यात आलं असून हे वक्तव्य महिलाविरोधी असल्याचं म्हटलं आहे.

आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना भाजप नेते शाहजाद पूनावाला यांनी सांगितलं की, "तेजस्वी यादव यांचे हे वक्तव्य महिलाविरोधी आहे. त्यांनी यासाठी माफी मागायला हवी. पाँडिचेरी काँग्रेसने त्यांनी डमी म्हटलं आणि आरजेडी आता पुतळा म्हणत आहे. तेजस्वी यादव यांची ही मानसिकता आदिवासी विरोधी असल्याचं दिसत आहे."

तेजस्वी यादव हे जन अधिकार पक्षाचे नेते सुबोध राय यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी शिवहर इथं गेले होते. त्यांनी राज्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून नितीश कुमार यांच्या सरकारवर टीका केली होती. शिवहर इथं त्यांना द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी कधीच द्रौपदी मुर्मूंचा आवाज ऐकला नाही.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या