मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  JP Nadda news : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला, पोलीस तपास सुरू

JP Nadda news : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला, पोलीस तपास सुरू

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 25, 2024 12:05 PM IST

JP Nadda wife car stolen : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नी मल्लिका यांची कार एक सर्व्हिस स्टेशनमधून चोरीला गेली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला (JP Nadda-X)

Mallika Nadda News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांची कार चोरीला गेली आहे. दिल्लीच्या गोविंदपुरी सर्व्हिस सेंटरमधून ही कार चोरीला गेली आहे.

मल्लिका नड्डा यांची टोयोटा फॉर्च्युनर कार गोविंदपुरी येथील सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यात आली होती. तिथून ती चोरीला गेल्याचं समजतं. कारचा चालक जोगिंदर सिंग यानं १९ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारचा शोध सुरू केला आहे.

चालकानं दिलेल्या तक्रारीनुसार, १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यानं सर्व्हिस सेंटरमध्ये कार पार्क केली. तो जेवण करण्यासाठी घरी गेला होता. पण, तो परत आला तेव्हा गाडी गायब होती. पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार कार गुरुग्रामकडे जाताना शेवटची दिसली. मात्र अनेक प्रयत्न करूनही अद्याप या गाडीचा ठावठिकाणा लागलेला नाही.

कोण आहेत जेपी नड्डा?

जेपी नड्डा हे २०२० पासून भापजचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते राज्यसभेचे खासदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. नड्डा यांच्या कार्यकाळात भाजपनं राजकीयदृष्ट्या चांगलं यश मिळवलं आहे. मात्र, त्यांच्या स्वत:च्या राज्यातील हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. असं असलं तरी पंतप्रधान मोदी यांचा नड्डांवरील विश्वास कायम आहे. सध्या ते लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यात गुंतले आहेत. अशातच त्यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्यामुळं सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

 

WhatsApp channel

विभाग