मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  EVM News : ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकपदी भाजपचे चार नेते; विरोधकांचं निवडणूक आयोगाला पत्र

EVM News : ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकपदी भाजपचे चार नेते; विरोधकांचं निवडणूक आयोगाला पत्र

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 31, 2024 02:29 PM IST

Congress raised question over EVM : ईव्हीएम मशीन तयार करणाऱ्या कंपनीच्या संचालकपदी भाजपच्या चार नेत्यांची मंत्र्यांची नेमणूक करण्यात आल्यावर काँग्रेससह माजी केंद्रीय सचिव ईएएस शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे.

congress raised question over EVM
congress raised question over EVM (Hindustan Times)

congress raised question over EVM : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. दरम्यान, ईव्हीएमतयार करणाऱ्या कंपनीच्या संचालक पदावर भाजपच्या चार नेत्यांची नेमणूक करण्यात आली असल्याने आत यावरून वादंग निर्माण झाले आहे. विरोधकांनी यावर सरकारला धारेवर धरले आहे तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर माजी केंद्रीय सचिव ईएएस शर्मा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आक्षेप घेतला आहे.

धक्कादायक! देशातील ७५ कोटी टेलिकॉम ग्राहकांचा डेटा धोक्यात, आधारपासून फोन नंबरपर्यंत सर्व काही लीक

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे उत्पादन आणि वितरण करते. ही कंपनी ईव्हीएम मशीनमध्ये असणाऱ्या चिपमध्ये लागणारा गुप्त कोडही तयार करते. दरम्यान, या कंपनीच्या संचालक मंडळात भाजपच्या चार नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या नियुक्तीवर माजी केंद्रीय सचिव ईएएस शर्मा आणि काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी आक्षेप घेतला आहे. या कंपनीवर जर भाजपचे नेते यातील तर ईव्हीएम मशीन मतदानासाठी खरच विश्वासार्ह आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगाने यावरंन तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

IFCI Share Price : शेअर असावा तर असा! अवघ्या दहा महिन्यात पैसे झाले सातपट

माजी केंद्रीय सचिव ईएएस शर्मा यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अन्य दोन निवडणूक आयुक्तांना पत्र लिहित या घटनेचा निषेध केला आहे. ईव्हीएम मशीनची सुरक्षितता आणि बिश्वासार्हता याबद्दल मी आयोगाला या पूर्वी सांगितले आहे. मात्र, आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शर्मा यांनी केला.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले की, ईव्हीएम बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडवर संचालक म्हणून कार्यरत असलेले भाजप पदाधिकारी असल्यास ही मशीन सुरक्षित कशी आहे. रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की हे निवडणुकीच्या पावित्र्याचे रक्षण कोण करेल? निवडणूक आयोग यावर गप्प का ? निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण द्यावे. तसेच भाजपच्या या चार नेत्यांची पदे रद्द करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केली.

WhatsApp channel

विभाग