मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shrikant Tyagi Arrested : महिलेला शिवीगाळ करणाऱ्या भाजप नेत्यासह तिघांना अटक

Shrikant Tyagi Arrested : महिलेला शिवीगाळ करणाऱ्या भाजप नेत्यासह तिघांना अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 11, 2022 10:44 AM IST

Shrikant Tyagi Arrested : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात भाजप नेता श्रीकांत त्यागी हा महिलेला शिवीगाळ करताना दिसत होता.

Shrikant Tyagi and his three companions arrested by Noida Police
Shrikant Tyagi and his three companions arrested by Noida Police (Hindustan Times)

BJP leader Shrikant Tyagi Arrested : उत्तर भारतातल्या राजकारणात सर्वात जास्त गाजत असलेल्या श्रीकांत त्यागी प्रकरणात आता एक मोठी अपडेट आहे. नोएडा पोलिसांनी श्रीकांत त्यागीसह तीन जणांना अटक केली आहे. याशिवाय त्यांना न्यायालयातही हजर केलं जाणार आहे. त्यामुळं आता यूपीत सर्वात जास्त गाजत असलेल्या आणि चर्चेत असलेल्या या प्रकरणात अखेर कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यात भाजप नेता श्रीकांत त्यागी हा एका महिलेला शिवीगाळ करत असल्याचं दिसत होतं, त्यामुळं विरोधकांनी भाजपवर थेट गुंडगिरीचे आरोप लावत या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून श्रीकांत त्यागी हा आपल्या साथीदारांसह फरार झाला होता. पोलिसही त्याचा सतत शोध घेत होते, अखेर आता त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळं आता पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडे उत्तर प्रदेश विधानसभा असं लिहिलेली एका कारही जप्त केली आहे.

भाजप नेता श्रीकांत त्यागी हा महिलेला धमकावत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या २४ तासांच्या आतच जवळपास १५ जणांच्या टोळक्यानं पिडितेच्या घरात घुसून तिला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर भाजपचेच खासदार महेश शर्मा यांनी या प्रकरणाची कारवाई करण्याची मागणी केली होती.

आरोपीचं घर पाडलं...

आरोपी श्रीकांत त्यागी हा फरार झाल्यानं दुसरीकडे त्याच्यावर दबाब आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं त्याचं घर पाडण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय त्याच्या दुकानांवरही जीएसटी विभागानं छापेमारी केली असून या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या