मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक, उदयपूर हत्याकांडाचा निषेध केल्यानं भाजप नेत्याची हत्या!

धक्कादायक, उदयपूर हत्याकांडाचा निषेध केल्यानं भाजप नेत्याची हत्या!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 28, 2022 11:42 AM IST

Udaipur Massacre : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबरांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशातील काही भागांमध्ये हिंसाचार झाला होता. याशिवाय उदयपूर आणि अमरावतीतील हत्याकांडानंतर आता कर्नाटकातही भाजप नेत्याची हत्या करण्यात आली आहे.

Praveen Kumar Nettaru Murder Karnataka
Praveen Kumar Nettaru Murder Karnataka (HT)

Praveen Kumar Nettaru Murder Karnataka : उदयपूरात घडलेल्या हत्याकांडाचा निषेध केला म्हणून कर्नाटकात एका भाजप नेत्याची हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून येणाऱ्या दोन लोकांनी भाजप नेते प्रवीण कुमार नेट्टारू यांची हत्या केली आहे. या हत्येचं कनेक्शन हे उदयपूरातील कन्हैया लाल यांच्या हत्येशी असल्याची माहिती मिळत आहे.

भाजप नेते प्रविण कुमार नेट्टारू हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये सक्रीय होते, ते सातत्यानं भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत होते, २९ जून रोजी त्यांनी उदयपूरात हत्याकांड झाल्यानंतर धार्मिक कट्टरतावादाविरोधात कठोर भाषा वापरली होती, याशिवाय त्यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येचाही निषेध केला होता, त्यामुळं त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते प्रविण यांचं पुत्तुरलगत असलेल्या बेल्लारे गावात चिकनचं दुकान होतं. व्यवसायाबरोबर ते राजकारणातही सक्रीय होते, त्यांनी उदयपूर हत्याकांडाचा निषेध केला म्हणून काही समाकंटक त्यांच्यावर पाळत ठेऊन होते, त्यामुळं दोन लोकांनी त्यांचा पाठलाग करून हत्या केली आहे. तर दोन दिवसांपूर्वी एका तरुणाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भाजप नेते नेट्टारू यांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा हिंदू कार्यकर्त्यांनी केला आहे.

दोषींवर कारवाई होणार-CM बोम्मई

या घटनेत दोषी असलेल्या लोकांना लवकरात लवकर पकडण्यात येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं आहे. या घटनेनंतर बंगळूरूपासून ४० किलोमीटर अंतरावर भाजपची एक मेगा रॅली आयोजित करण्यात येणार होती, त्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहणार होते, परंतु भाजप नेत्याच्या हत्येनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या