मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भाजप नेत्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले अपहरण, सामूहिक बलात्कारानंतर केली हत्या

भाजप नेत्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले अपहरण, सामूहिक बलात्कारानंतर केली हत्या

Jun 26, 2024 04:14 PM IST

Minor Girl Gang Rape : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली गेली. याप्रकरणी भाजप नेते आणि ओबीसी आयोगाचे सदस्य आदित्यराज सैनी यांच्यासह दोन लोकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या

भाजप नेत्यावर एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण करणे तसेच गँगरेप केल्यानंतर तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. मुलीचा मृतदेह महामार्गाच्या कडेला पडला होता. मृत मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे. हा प्रकार हरिद्वार जिल्ह्यात समोर आला आहे. 

बहादराबाद परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली गेली. याप्रकरणी भाजप नेते आणि ओबीसी आयोगाचे सदस्य आदित्यराज सैनी यांच्यासह दोन लोकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बहादराबाद पोलिसांनी सोमवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास हरिद्वार-दिल्ली महामार्गाच्या किनारी एका मुलीचा रक्कबंबाळ अवस्थेतील मृतदेह मिळाला.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले की, २३ जूनच्या सायंकाळी अमित सैनी अल्पवयीन मुलीला घेऊन गेला होता. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिची शोधाशोध सुरू केली. तिच्या नंबरवरती फोन केल्यानंतर कॉल अमित याने उचलला. त्याने सांगितले की, काही वेळात मुलगी घरी येईल मात्र काही वेळानंतर फोन बंद केला. 

ट्रेंडिंग न्यूज

मुलीच्या आईने मंगळवारी अमितचे नातेवाईक व मागासवर्ग आयोगाचे सदस्य आदित्यराज सैनी यांना भेटून मदत मागितली. मुलीच्या आईने आरोप केला आहे की, अमित गेल्या सहा महिन्यापासून प्रेमाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार करत होता. अमित आणि आदित्यराजने सामूहिक बलात्कार करून मुलीची हत्या केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गँगरेप, हत्या आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. आदित्यराज भाजपमध्ये विविध पदांवर कार्यरत होता. 

पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर भाजपा नेत्याच्या वाढू शकतात अडचणी –

अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर भाजप नेते आदित्यराज सैनी यांच्या अडचणी वाढू शकतात. मंगळवारी दुपारी कडक सुरक्षा व्यवस्थेत गावातील स्मशानभूमीत मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राथमिक तपासात अजूनपर्यंत कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाहीत. गावाला पोलीस छावणीचे रुप आले आहे. मंगळवारी सकाळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. 

त्यांनी याप्रकरणात कडक कारवाईची मागणी केली. प्रकरणाची संवेगनशीलता पाहून मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम डॉक्टरांच्या पथकाने केला. पुलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. 

व्हिडिओग्राफी करत जाले पोस्टमार्टम -
व्हिडिओग्राफी करत अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले गेले. तीन डॉक्टरांच्या पॅनलने मृतदेहाचे पोस्टमार्टम केले. 

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर